एक खोल श्‍वास

घराच्या जबाबदाऱ्या सांभाळताना मनावरचा ताण ओळखणं आणि त्यावर सजगपणे काम करणं गरजेचं आहे. एक खोल श्वास आणि सकारात्मक स्व-संवाद मानसिक स्थैर्याची पहिली पायरी ठरू शकते.
Everyday Stress and the Hidden Mental Load

Everyday Stress and the Hidden Mental Load

Sakal

Updated on

डॉ. सुवर्णा बोबडे

मन-निर्मळ

सकाळचे साडेआठ वाजले होते. मृण्मयी स्वयंपाकघरात उभी होती, पण तिच्या मनात आणि घरात दोन्हीकडे गोंधळ उडालेला होता. गॅसवर भाजी होती, कुकरची शिट्टी होणार होती, मुलांचा डबा अजून पूर्ण झाला नव्हता आणि नवरा ऑफिसला निघायची घाई करत होता. त्याच वेळी लहान मुलगा म्हणाला, ‘‘आई, आज मला टिफिनमध्ये इडली नकोय, पास्ता हवाय! शर्विलची आई नेहमी देते, तू देतच नाहीस...’’ तेवढ्यात फोन वाजला. गॅसवर दूध उतू जाऊ लागलं. मृण्मयीच्या मनात विचारांची गर्दी झाली. ‘‘हे कधी संपतच नाही. सकाळी उठल्यापासून मीच सगळं करते आहे. कुणालाच कळत नाही, मी किती दमते ती. या घरात मला शून्य मदत आहे, तशीच माझ्या कष्टांची किंमतही शून्यच आहे. सगळ्यांची मनं सांभाळायची जबाबदारी माझीच. त्या बदल्यात कोणी दोन कौतुकाचे शब्दसुद्धा बोलत नाही. हे काय आयुष्य आहे माझं!’’ तिचा आवाज चढला, हालचाली घाईच्या झाल्या आणि छातीत दडपण जाणवू लागलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com