

Changing Expectations of Marriage in Modern Times
sakal
सावनी देशपांडे
सध्याच्या काळात मुले-मुली दोघेही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि उच्चशिक्षित झाल्यामुळे त्यांच्या विवाहाच्या बाबतीतल्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्याबरोबर पालकांच्याही अपेक्षा वाढल्या आहेत. विवाहाच्या वेळी मुले-मुली दोघांची वये बरीच वाढलेली दिसून येतात. जोडीदार निवडताना एकमेकांच्या अपेक्षा, विवाहाबाबतच्या कल्पना आणि विचार जरी स्पष्ट असले, तरी मनासारखा जोडीदार मिळेलच याची खात्री कुणालाही देता येत नाही. अशा वेळी विवाहपूर्व समुपदेशनाचा चांगला फायदा होतो.