Lip Care
Lip Care esakal

Lip Care : ओठ काळवंडलेत? अनेकांना माहिती नसणारा हा उपाय वाढवेल तुमच्या ओठांची लाली

आज आपण स्कीन अँड ब्युटी केअर रिया वशिष्ठ यांच्याकडून ओठांवर सनस्क्रीन लावण्याचे फायदे जाणून घेऊयात.
Published on

Lip Care : ओठांची त्वचा फार नाजूक असते. जेवढी आपण हातापायाच्या त्वचेची काळजी घेतो तेवढीच ओठांचीही काळजी आवश्यक असते. ओठ सुंदर, मुलायम आणि गुलाबी असायला हवे असे प्रत्येक महिलेला वाटते. मात्र त्वचेची योग्य काळजी न घेतल्याने आणि सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणामुळे ओठांचा रंग काळा होऊ लागतो. तसेच यूव्ही रेजमुळे देखील ओठांना इजा पोहोचते.

फाटलेले ओठ बरे करण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपायांचा अवलंब करू शकता. ओठांना यूव्ही रेजपासून वाचवण्यासाठी तुम्ही एक खास उपाय करू शकता. आज आपण स्कीन अँड ब्युटी केअर रिया वशिष्ठ यांच्याकडून ओठांवर सनस्क्रीन लावण्याचे फायदे जाणून घेऊयात.

याआधी तुम्ही कधी ओठांवर सनस्क्रिन लावली आहे काय?

ओठांवर सनस्क्रिन लावून तुम्ही यूव्ही रेजपासून ओठांची सुरक्षा करू शकता. सनबर्नमुळे ओठ फाटणे, ओठ काळवंडणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. सनस्क्रीन सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरणांना रोखून सनबर्नच्या समस्या टाळण्यास मदत होते. तसेच स्किन कँसरचाही धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

ओठांवर कधी सनस्क्रिन लावली आहे काय?

ओठांवर सनस्क्रिन लावून तुम्ही यूव्ही रेजपासून ओठांची सुरक्षा करू शकता. सनबर्नमुळे ओठ फाटणे, ओठ काळवंडणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. सनस्क्रीन सूर्याच्या हानिकारक यूव्ही किरणांना रोखून सनबर्न टाळण्यास मदत करू शकते.

स्किन कँसरपासून बचाव

हल्ली स्किन कँसरचे रूग्ण वाढतच चालले आहे. स्किन कँसर ओठांबरोबरच त्वचेच्या कोणत्याही भागावर वाढू शकते. सनस्क्रीन सूर्याच्या हानिकारक किरणांना त्वचेपर्यंत पोहोचण्यापासून रोखते.

मॉश्चरायझेशन

सनस्क्रीन तुमच्या ओठांना मुलायम ठेवण्यास फायदेशीर आहे. ओठ अनेकदा कोरडे पडतात आणि फाटतात. तुमच्या ओठांसाठी सनस्क्रीन निवडताना अशी सनस्क्रीन निवडा ज्यात ब्रॉड स्पेक्ट्रम असेल आणि 30 किंवा त्यापेक्षा अधिक SPF असेल. तुम्हाला फारच घाम येत असेल तर तुम्ही दर दोन तासांनी सनस्क्रीन लावू शकता.

Lip Care
Lip Care Tips : ओठांवरची चमक आणि सॉफ्टनेस कायम ठेवायची असेल तर घरीच करा हा उपाय

सनस्क्रीन लावण्याचे इतर काही फायदे

ओठांच्या सुरकुत्या कमी होतात

सूर्याचे यूव्ही रेज तुमच्या ओठांवरील कोलेजन आणि इलास्टिनला नुकसान पोहोचवू शकतात. ज्यामुळे ओठांवरील सुरकुत्या आणि फाइन लाइन्स वाढतात. लिप सनस्क्रीन ओठांच्या या समस्यांपासून तुमचा बचाव करते. (Lifestyle)

Lip Care
Lip Care Mask :  काळवंडलेल्या ओठांना बनवा पिंक-लिप्स; हे मास्क करतील मदत

हायड्रेशन

सूर्याच्या किरणांनी ओठ सुकतात. ज्यामुळे तुमचे ओठ फाटतात आणि ओठांची स्किन असामान्य दिसते. सनस्क्रीनमुळे तुमचे ओठ हायड्रेटेड राहतात.

गुलांबी ओठांसाठी सनस्क्रीन फायद्याची

सनस्क्रीनच्या नियमित उपयोगाने तुमचे ओठ गुलाबी आणि मऊ होतात. सनस्क्रीन लावल्यानंतर तुम्ही त्यावर लिपस्टिक लावू नका. ओठांवर रिअॅक्शन होण्याची शक्यता वाढते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com