esakal | निरोगी राहाचंय चला मित्रांसोबत...
sakal

बोलून बातमी शोधा

निरोगी राहाचंय चला मित्रांसोबत...

निरोगी राहाचंय चला मित्रांसोबत...

sakal_logo
By
अर्चना बनगे

मला सतत टेन्शन येते. खुप थकवा जाणवतो, आज काम करायची इच्छा नाही. काय करू? असे प्रश्न तुम्हाला खुपदा पडले असतील. कधीकधी काहींना दररोज या गोष्टीना फेस करावं लागतं. मग यातून बाहेर येण्यासाठी योगा, मेडीटेशन, जीम अगदीच औषधांची ही गरज पडते. नेमकं काय करावं हे सूचत नाही. अश्यावेळी एक पर्याय समोर येतो ते म्हणजे मित्र. हो ना! खरंच जर तुम्हाला निरोगी व्हायचे असेल तर तुमच्या मित्रांसोबत अधिकाधिक वेळ घालवा. आम्ही हे सांगत नाही, पण एका संशोधनातून समोर आले आहे की बालपणाची मैत्री तुमच्या आरोग्यासाठी चांगली आहे. हे संशोधनातून कसे सिध्द झाले आहे.चला तर जाणून घेऊया.

असे आहे संशोधन

सायकोलॉजिकल सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, जी मुले बालपणात त्यांच्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवतात ती जेव्हा 30 वर्षांचे होतात तेव्हा त्यांचा रक्तदाब आणि BMI कमी असतो.

संशोधक काय म्हणतात?

अमेरिकेतील टेक्सास टेक युनिव्हर्सिटीच्या जेनी कॅंडिफ यांनी सांगितले की, निष्कर्ष असे दर्शवतात की प्रौढ म्हणून सुरुवातीच्या जीवनाचा आपल्या शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. जेव्हा आपण मोठे होतो तेव्हाही लहानपणीचे मित्र आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात.

असे केले संशोधन

या संशोधनात 267 लोकांशी संबंधित डेटाची चाचणी घेण्यात आली. यामध्ये सहभागी झालेल्या पालकांनी सांगितले की त्यांची मुले एका आठवड्यात त्यांच्या मित्रांसोबत किती वेळ घालवतात. या टेस्टची सुरुवात मुले सहा वर्षांची होती तेव्हा सुरू होऊन, हीच मुले 16 वर्षांची होईपर्यंत करण्यात आली. या संशोधनावरून असे लक्षात येते की, मित्र हे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. जर जास्त तरुण राहायचे असेल तर वेळ अजूनही गेली नाही. चांगले मित्र बनवा.

loading image
go to top