lockdown2021: माहौल फिर से बन रहा है!  सोशल मीडियावर मीम्स व्हायरल

lockdown 2021 is trending on twitter
lockdown 2021 is trending on twitter

चीनच्या वुहान प्रांतातून उद्रेक झालेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात हातपाय पसरले आहेत. गेल्या वर्षभरापासून या विषाणूने सर्वत्र थैमान घातलं आहे. आतापर्यंत कोरोनामुळे अनेकांना प्राण गमाववे लागले आहेत. त्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी किंवा त्याचा संसर्ग रोखण्यासाठी आतापर्यंत अनेक राज्यांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. यामध्येच आता मध्य प्रदेशातील भोपाळ, इंदूर आणि जबलपूर  येथे आज (२१ मार्च) पूर्णपणे कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. इतकंच नाही तर, ३१ मार्चपर्यंत शाळा-महाविद्यालयेदेखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर सोशल मीडियावर तुफान मीम्स व्हायरल झाले आहेत.

शुक्रवारी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये  मध्य प्रदेशमधील भोपाळ, इंदूर आणि जबलपूर येथे लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. तर, यापूर्वी महाराष्ट्रातील नागपूर येथे १५ मार्च ते २१ मार्च पर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे.  तसंच, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरात येथे नाइट कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे देशभरातील विविध राज्यांमध्ये होत असलेला हा लॉकडाउन पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. यामध्येच आता सोशल मीडियावर #lockdown2021 हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला आहे.

दरम्यान, आतापर्यंत देशात कोरोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढतांना दिसत आहे. देशात एका दिवसात ४०,९५३ नवे रुग्ण सापडले असून १११ दिवसांमधील हा उच्चांक असल्याचं सांगण्यात येत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com