Perfume Day : ओरिजिनल अत्तराच्या शोधात आहात? पुण्यात इथे मिळतात स्वस्तात मस्त! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Places in Pune for Perfume

Perfume Day : ओरिजिनल अत्तराच्या शोधात आहात? पुण्यात इथे मिळतात स्वस्तात मस्त!

Places in Pune for Perfume : अॅंटी व्हॅलेन्टाईन वीक सर्वत्र साजरा होतो आहे याच दिवसांमधला एक दिवस म्हणजे परफ्यूम डे. आज सगळेच आपल्या मित्रांना जवळच्या लोकांना परफ्यूम गिफ्ट म्हणून देत असतात. काही लोकं आपल्यासाठी म्हणून विकत घेत असतात.

अत्तर ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकालाच आवडते असं नाही पण ज्यांना अत्तराचं व्यसन लागलं त्याला परत डियो वापरावेसे वाटत नाही. अत्तर वापरणं तसं खूप चांगलं असतं कारण त्यात गॅस नसतो आणि डियो वापरल्यामुळे त्वचेच्या उद्भवणाऱ्या समस्या अत्तराने उद्भवत नाही.

अत्तरांबद्दल असलेला एक मोठा गैरसमज म्हणजे अत्तरं खूप स्ट्रॉंग असतात, पण असं काही नाहीये, अत्तरांचे वेगवेगळे फ्लेवर येतात आणि तुम्ही आपल्या आवडीनुसार तसे अत्तरं विकत घेऊ शकतात. त्यातल्या त्यात एकदम लाइट आणि लॉन्ग लास्टिंग अत्तर म्हणजे व्हाइट मस्क. कस्तूरीमृगाच्या कस्तूरीपासून हे अत्तर बनवले जाते.

अत्तरांचे काही तोटेही आहेत

  • अत्तर लावल्याने कपड्यांवर डाग पडू शकतो.

  • थेट त्वचेवर अत्तर लावणे स्किन रॅशेजला आमंत्रण ठरू शकते.

  • प्रत्येक अत्तर प्रत्येकाला सूट होईलच असं नाही अशाने तुमचं डोकं दुखू शकतं

  • अत्तर तसे महाग असतात त्यामुळे प्रत्येकाला परवडतातच असं नाही.

पुण्यात इथे मिळतात स्वस्त अन् सर्वप्रकारची अत्तरे

पुण्यात बोहरी आळी, शुक्रवार पेठेजवळ, पसोड्या विठोबाच्या पुढच्या गल्लीत अत्तराची काही दुकाने आहेत. इथे सर्व प्रकारचे अत्तरे आणि त्याच्या कुपी मिळतात.

टॅग्स :TravelPune NewsPerfume