Dateवर पार्टरनला गिफ्ट द्यायंचयं? बजेट कमी आहे, मग या ट्रिक्स वापरा

Dateवर पार्टरनला गिफ्ट द्यायंचयं? बजेट कमी आहे, मग या ट्रिक्स वापरा

पहिल्यांदा डेटवर गेल्यावर सर्वसाधारणपणे अनेकजण पार्टनरला चॉकलेट्स आणि फुले गिफ्ट करतात. पण काही वेळा बजेट खूपच कमी असल्याने हे नेहमी देणे जमतेच असे नाही. गिफ्ट न दिल्यामुळे दोघांपैकी एक निराश होऊ शकतो. किंवा तुम्ही फिरायला गेलात की काहीतरी खाल्ले जाते अशावेळी नेहमी तो बिल भरतो. किंबहुना तो इंप्रेस करण्यासाठी बिल भरणार असतो. पार्टनरवर किती खर्च करायचा हे मात्र अनेकदा ठरलेले नसते. त्यामुळे अडचणी येऊ शकतात. म्हणून मग कमी बजेट असले तरीही आपण आकर्षक आणि पार्टनरचे मन जिंकेल असे गिफ्ट देऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता नाही.

ब्लॅंकेटचा तंबू- भन्नाट काहीतरी करावसं वाटत असेल तर एक छान जागा निवडा. तिथे एक ब्लॅकेटचा तंबू उभारून तो अगदी छोट्या गोष्टींनी, फुलांनी सुशोभीत करा. तिथे तुम्ही पार्टनरसोबत छान वेळ घालवू शकता. इथला माहोल आणखी रॉमेंटिक करण्यासाठी तुम्ही फ्लफी कुशन आणि दिवे वापरू शकता.

लहानपणीचे फोटो पाहत दुपार घालवा- डेटिंग करताना त्याच्या जीवनाशी माहिती मिळविणे अत्यंत चांगले असते. त्यासाठी विविध मार्ग आहेत. काही फोटोज  पाहून त्याचे बालपण कसे होते, याची माहिती घेता येईल. तुम्ही तुमच्या बालपणीचा अल्बम त्याला दाखवा. पुढच्यावेळी  किंवा त्याच डेटला त्याचे लहानपणीचे फोटो त्याला आणायला सांगा. याद्वारे असे फोटो शेअर करून काही सुंदर आठवणी सांगून तुम्ही एकमेकांबरोबर अविस्मरणीय क्षण घालवाल. तसेच  मजेदार आणि काही गंमतशीर घटना आठवून सांगितल्याने तुमच्या गप्पांमधून बंध अधिक मजबूत होतील.

एखाद्या गार्डनमध्ये जा- एखाद्या गार्डनमध्ये निसर्गाच्या सानिध्यात गप्पा मारणे हा एक वेगळा अनुभव आहे. तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर सोबत खायचे पदार्थ, ब्लॅकेट न्या. ही डेट फारच लक्षात राहणारी राहील. तुमच्या फोनवर एखादे मंद संगीत वाजवा. जर गिटार येत असेल तर तीही न्या. पार्टरनरसाठी गिटार वाजवून छान गाणे म्हणा. यातून पार्टनर खूष तर होईलच. पण तुमच्यातले बंध अधिक मजबूत होतील,

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com