पुन्हा ‘बेल बॉटम’ची एन्ट्री

bail-bottom
bail-bottom

कॉलेजमध्ये विविध डेज सुरू झालेत? मग तर तुम्हाला एखादा झकास पर्याय सुचवणं ‘बनता है बॉस’! वन पीस, मॅक्सीड्रेस हे आपण नेहमीच घालतो. पण आता बेल-बॉटम जीन्सच्या फॅशनची चलती आहे. कॉलेजमध्ये इतरांपेक्षा हटके, पण फॅब्युलस लुकसाठी हा पर्याय तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा.

युरोप आणि नॉर्थ अमेरिकेमध्ये १९६०च्या दरम्यान बेल-बॉटमने एन्ट्री मारली. आपल्याकडेदेखील अनेक हिरो-हिरोईन्सने ही फॅशन फॉलो केली. आता हाच ट्रेन्ड मार्केटमध्ये आला आहे. मागच्या वर्षी दीपिकाचा कान्समधील या जीन्समधील लुक व्हायरल झाला होता. सध्या बेल-बॉटममध्ये विविध डिझाईन्स मॉल, शॉपिंग साइट्सवर पाहायला मिळतात. हाय वेस्ट, टोन्ड, फ्लोरल प्रिंट बेल-बॉटम सध्या भाव खात आहे. मांडीपर्यंत घट्ट आणि बॉटम लूज पॅर्टनचा असल्याने जीन्समधील हा प्रकार अधिक कम्फर्टेबल आणि फॅशनेबल आहे. या पर्यायाचा विचार नक्की करून बघा! या जीन्सची रेंज एक हजार रुपयांच्या पुढे सुरू होते. 

स्टायलिश लूकसाठी...
सगळ्यांच्याच नजरा तुमच्यावर खिळवून ठेवण्यासाठी बेल-बॉटमवर क्रॉप टॉप, ऑफ शोल्डर टॉप, ट्यूब आणि पोलो टॉप, टी-शर्ट, शॉर्ट स्वेटर, सॅन्डो हे घालून बघा. 
यावर प्लॅटफॉर्म हिल्स, कट आउट हिल्स, पंप्स, स्लिंग बॅक हिल्स, अँकल बूट्स भन्नाट दिसतात. 
बेलबॉटमवर स्लिंग बॅग, क्लच बॅग अधिक छान दिसतात. केस मोकळे सोडा. किंवा हेअरस्टाइल करायचीच असेल तर हाय बन बांधू शकता. 
मेकअप करताना थोडा लाइटच करा. आयशॅडो हलका गडद लावा. अधिक हटके लूकसाठी कॅटआय व ब्लॅक रंगाचा गोल आकाराचा सनग्लासेस लावायला विसरू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com