
marriage lessons from Shiva Parvati: यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारी रोजी साजरी केली जात आहे. हा दिवस शिवभक्तासाठी खुप खास आहे. तसेच या दिवशी महादेवाला आवडत्या गोष्टी अर्पण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
भगवान शिव आणि माता पार्वती हे आदर्श कौटुंबिक जीवनाचे प्रतीक आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव यांचा विवाह माता पार्वतीशी झाला होता. वैवाहिक जीवनात आनंद मिळावा म्हणून लोक महाशिवरात्रीला उपवास करतात आणि पूजा करतात.
वैवाहिक जीवनात आनंदी आणि सुखी बनविण्यासाठी आपण भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यातील नातेसंबंधातून शिकू शकतो. त्यांचे लग्न केवळ एक धार्मिक कथा नाही तर प्रत्येक जोडप्यासाठी प्रेरणा आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराप्रती प्रेम, आदर, संयम, संवाद आणि समर्पण राखले तर तुमचे वैवाहिक जीवनही आनंदी होऊ शकते.