
Maha Shivratri 2025 Marathi Wishes: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला सणाला खुप महत्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शंभू आणि माता पार्वतीचा विवाह फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशीला झाला होता, त्यानंतर हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो. यंदा महाशिवरात्री २६ फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे. हा दिवस शिवभक्तासाठी खुप खास मानला जातो. देशभरात मंदिरांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच शुभेच्छा देखील पाठवल्या जातात.