

Prayagraj Kumbh Mela Stampede: महाकुंभ मेळा यंदा प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मौनी अमावस्येच्यानिमित्ताने अनेक भाविकांनी स्नानासाठी अलोद गर्दी केली होती. यामुळे चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत अनेक भाविक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. २९ जानेवारीला रात्री एक वाजण्याच्या सुमारास घाटाजवळ आंघोळीसाठी जमलेल्या लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. यात अनेक जण जखमी झाल्याची, दुखापत झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभातील जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे.