Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Maharashtra Day 2024: दरवर्षी १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त तुमच्या प्रिय व्यक्तीला खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा देऊ शकता.
Maharashtra Day 2024:
Maharashtra Day 2024: Sakal

दरवर्षी १ मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या आनंदात साजरा केला जातो. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती.  तसेच १ मे हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवस ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तुमच्या प्रिय व्यक्तीला महाराष्ट्र दिनानिमित्त खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा द्यायच्या असेल तर पुढील मॅसेज पाठवू शकता.

महाराष्ट्र दिनानिमित्त खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी… महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

महाराष्ट्रीयन असण्याचा मला अभिमान आहे. राज्य जे सर्वांसाठी आणि भारतासाठी अभिमानास्पद आहे. जय महाराष्ट्र, महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

कपाळी केशरी टिळा लावितो… महाराष्ट्र देशा तुला वंदितो…. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

पुर्नजन्म घेतला तरी महाराष्ट्रात घेईन आणि या मातीत जन्मलेल्या वीरांसारखा शूरवीर होईन
महाराष्ट्र दिन शुभेच्छा संदेश

धन्य आहे ही महाराष्ट्राची माती कोटी कोटी नमन या पवित्र धरणीला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

जन्मलो ज्या मातीस ती माती मराठी… गुणगुणलो जे गीत गीत मराठी…. मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com