
Mahashivratri 2023: महाशिवरात्रीला कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावेत? काय सांगते शास्त्र!
उद्या फेब्रुवारी रोजी देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाने कैलास पर्वतावर माता पार्वतीशी विवाह केला होता. म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा अत्यंत फलदायी मानली जाते.
लोक या दिवशी उपवास करतात आणि दिवसभर भगवान शंकराचे ध्यान करतात. महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांना स्वर्ग मिळतो, असे मानले जाते. या व्रताचे पालन केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि आत्मा शुद्ध होतो. या सणाचे आणि रंगांचे विशेष नाते आहे.(Mahashivratri 2023: mahashivratri 2023 colours should never wear and why)
महाशिवरात्री व्रताशी संबंधित अनेक नियम आहेत. जे लोकांनी पाळले तर या व्रताचे फळ नक्की मिळते. त्यामुळे या दिवशी काय घालावे हे पाहुयात. भगवान शंकरांना पांढरा रंग आवडतो. महाशिवरात्रीच्या दिवशी शंकरांचा आवडत्या पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करतात. शास्त्रातही शंकरांच्या व्रतादिवशी पांढऱ्या कपड्यांनाच महत्त्व दिले जाते.
महाशिवरात्री दिवशी बहुतेक लोक हिरवा, पिवळा, लाल, नारंगी, पांढरा, गुलाबी आणि बरेच रंग घालतात. तूम्हाला हवा तो रंग घाला पण महाशिवरात्रीला काळ्या रंगापासून दूर रहा. या दिवशी काळा रंग चुकूनही परिधान करू नका.
काळा रंग नकारात्मक ऊर्जेचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे काही अनिष्ठ घडू नये असे वाटत असेल तर काळा रंग घालू नये. काळा रंग अशूभ गोष्टीचे प्रतिनिधित्व करतो.
त्यामुळे आपल्याकडे पाहुन इतरांना सकारात्मक उर्जा मिळेल. तूम्हाला स्वत:ला फ्रेश आणि सकारात्मक वाटेल असे रंग परिधान करा.

शिवभक्ती