Mahashivratri 2024 : शंभू महादेवांचा आशिर्वाद हवाय? तर महाशिवरात्रीला करा ‘या’ गोष्टींचे दान, संकटांच्या फेऱ्यातून व्हाल मुक्त

Mahashivratri 2024 : हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला फार महत्व आहे. ही महाशिवरात्री देशात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते.
Mahashivratri 2024
Mahashivratri 2024esakal

Mahashivratri 2024 : हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला फार महत्व आहे. ही महाशिवरात्री देशात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी भगवान शंकाराच्या शिवलिंगाची विधिवत पूजा केली जाते. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या महाशिवरात्रीला विशेष महत्व आहे. या दिवशी महादेवाला रूद्राभिषेक करण्याचीही परंपरा आहे.

महाशिवरात्रीच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी शंभू महादेवाची आणि पार्वतीची पूजा करणे शुभ आणि फलदायी असते. अवघ्या काही दिवसांवर महाशिवरात्री येऊन ठेपली आहे. या महाशिवरात्रीनिमित्त कोणत्या गोष्टींचे दान करणे शुभ असते? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

Mahashivratri 2024
Mahashivratri 2024 : यंदा महाशिवरात्री कधी आहे? जाणून घ्या महत्त्व आणि मुहूर्त

तूप

महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर तूपाचा अभिषेक करणे, शुभ मानले जाते. महादेवाला तूपाचा अभिषेक केल्यानंतर तूपाचे दान ही करावे. महाशिवरात्रीला तूपाचे दान केल्याने घरातील संकटे टळतात असे मानले जाते. तसेच, घरातील नकारात्मकता बाहेर जाते आणि घरात सकारात्मक वातावरण तयार होते. त्यामुळे, महाशिवरात्रीला तूप दान अवश्य करा.

तीळ

महाशिवरात्रीच्या दिवशी तीळाचे दान अवश्य करावे. या दिवशी शंभू महादेवाच्या शिवलिंगावर तीळ अर्पण केल्याने पितृदोष दूर होतो. तसेच, पित्रे प्रसन्न होतात आणि त्यांची आपल्यावर कृपा राहते. या दिवशी तीळ दान केल्याने ग्रहांचा प्रभावही शांत होण्यास मदत होते, असे मानले जाते.

महाशिवरात्रीला तीळदान केल्याने ग्रह अनुकूल होऊन शुभ परिणाम मिळू लागतात. यासोबतच तुमची प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लागतात. त्यामुळे, या दिवशी तीळाचे दान नक्की करा.

वस्त्र

महाशिवरात्रीच्या दिवशी वस्त्रांचे दान करणे, हे शुभ मानले जाते. या दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला कपडे दान केल्याने, तुम्हाला जीवनात आनंद मिळतो. तुमची किंवा घराची आर्थिक स्थिती सुधारते आणि घरात ऐश्वर्य, सूख-शांती आणि समाधान नांदते. तसेच, महादेव-पार्वतीची तुमच्यावर कृपा राहते.

दूध

महाशिवरात्रीच्या दिवशी शंभू महादेवाला दूधाचा अभिषेक जरूर करावा. शिवलिंगाला दूध अर्पण करण्यासोबतच या दूधाचे दान अवश्य करावे. या दिवशी दूध दान केल्याने मानसिक शांती मिळते आणि घरात सूख-शांती नांदते. महादेव-पार्वतीचा शुभ आशीर्वाद मिळतो, अशी धार्मिक मान्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com