Mahavir Jayanti 2024: महावीरांच्या तत्त्वज्ञानात स्त्री-पुरुष समानता

भगवान महावीरांच्या काळात जीव आणि विश्व, जन्म आणि मृत्यू, स्वर्ग आणि नरक आदींसंदर्भात विविध धर्म-मते प्रचलित होती.
Mahavir Jayanti 2024:
Mahavir Jayanti 2024: Sakal

वासंती अशोक काळे

न धर्माच्या मान्यतेनुसार विद्यमान अवसर्पिणी काळात भगवान ऋषभ देव यांच्यापासून भगवान महावीर यांच्यापर्यंत चोवीस तीर्थंकर झाले आहेत. सध्या भगवान महावीरांचे तीर्थ सुरू आहे. भगवान महावीरांच्या काळात जीव आणि विश्व, जन्म आणि मृत्यू, स्वर्ग आणि नरक आदींसंदर्भात विविध धर्म-मते प्रचलित होती. प्रत्येक धर्म आपलीच मते सत्य असल्याचे सांगत असत. त्यातून समाजात हिंसा, द्वेष, असहिष्णुता, अज्ञान, अंधश्रद्धा वाढीस लागली होती. धर्माच्या नावावर कर्मकांडाला महत्त्व प्राप्त झाले होते.

अशा स्थितीत महावीरांनी परस्परोपग्रहो जीवानाम् अर्थात प्रत्येक जिवाला स्वतःचा जीव प्रिय असतो आणि म्हणूनच प्रत्येक जिवाला जगण्याचा अधिकार असला पाहिजे, असे स्पष्ट करून ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वाच्या माध्यमातून अहिंसा तत्त्वाचा उद्‍घोष केला. शांततामय सहजीवनासाठी अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य या पंचसूत्रीचे पालन आवश्‍यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

भगवान महावीरांनी मांडलेला कर्म-सिद्धांत त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन स्पष्ट करतो. ‘मनुष्य जन्म से नहीं, कर्म से महान बनता हैं’ हे भगवान महावीरांचे प्रतिपादन आज जगभर मान्यता पावलेले आहे. सुख, समृद्धी आणि शांतीसाठी प्रत्येक व्यक्तीने शुद्ध आचरण, अहिंसक वृत्ती व परस्पर सहयोगाची भावना राखणे आवश्‍यक आहे.

जैन तत्त्वज्ञानानुसार जन्म आणि मृत्यू या अपरिहार्य बाबी असून, हे विश्र्व अनादी व अनंत आहे, याचा कोणी निर्माता नाही किंवा विनाशक नाही. कर्म सिद्धांतानुसार उत्पत्ती, विनाश आणि पुन्हा उत्पत्ती असे विश्वचक्र चालू राहते. भगवान महावीरांनी स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. त्यांनी आपल्या कर्मतीर्थ-धर्मतीर्थामध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने दर्जा दिला. भगवान महावीरांनी प्रतिपादन केलेली तत्त्वे आजही मानव-समाजासाठी तेवढीच उपयुक्त व संयुक्तिक आहेत.

Mahavir Jayanti 2024:
Mahavir Jayanti 2024: महावीर जयंतीनिमित्त जाणून घ्या भगवान महावीरांचे पाच सिद्धांत

एकांतवादी दृष्टिकोनाऐवजी अनेकांतवादी दृष्टिकोनाचा अवलंब केल्यास विविध समस्या सहज सुटतील. कोणताही विचार, वस्तू केवळ सत् किंवा असत् नसते, तर त्यात सत् आणि असत् या दोन्ही धर्मांचे सहअस्तित्व असते. प्रत्येक विचार, वस्तू यांना व्यक्तिसापेक्ष वेगवेगळ्या बाजू असतात. हे तत्त्व मान्य केले तर संघर्षाला वाव उरणार नाही. भगवान महावीरांनी प्रतिपादन केलेल्या अहिंसा, सत्य, अस्तेय (अचौर्य), अपरिग्रह व ब्रह्मचर्य आणि सम्यक् ज्ञान, सम्यक् दर्शन आणि सम्यक् चारित्र्य या तत्त्वांचा अंगीकार केल्यास मानव समाजाच्या शांततामय सहजीवन आणि समृद्धीचा मार्ग निश्‍चितच प्रशस्त होईल.

भगवान महावीरांना जयंतीनिमित्त प्रणाम!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com