Car Safety: कार चालवताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका, होवू शकतो ब्लास्ट

आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला आरामदायी प्रवास करता यावा यासाठी कार खरेदी केली जाते. या कारचा आपण पूर्णपणे उपभोग घेत असतो. मात्र कार वापरत असताना काही साधारण वाटणाऱ्या गोष्टींकडे देखील लक्ष देणं महत्वाचं आहे
कारची काळजी
कारची काळजीEsakal

आपला आणि आपल्या कुटुंबाला आरामदायी प्रवास करता यावा यासाठी कार खरेदी केली जाते. या कारचा आपण पूर्णपणे उपभोग घेत असतो. मात्र कार वापरत असताना काही साधारण वाटणाऱ्या गोष्टींकडे देखील लक्ष देणं महत्वाचं आहे. तुमची एक छोटीशी चूकदेखील मोठ्या दुर्घटनेसाठी जबाबदार ठरू शकते. Maintain your car to avoid failure and accidents Automobile news in Marathi

जर तुम्ही कार घेतली असेल आणि तिचा वापर करत असाल तर तुमच्या गाडीबद्दल तुम्हाला काही महत्वांच्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. अनेकदा कारमध्ये Car आग लागण्याच्या दुर्घटना Accident घडल्याबद्दल तुम्ही एकलं असेल. कितीही महागडी गाडी असली तरी एखाद्या चुकीमुळे आग लागण्याची शक्यता निर्माण होवू शकते. त्यामुळेच वेळीच काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. Car Safety Tips

काही तज्ञांच्या मते जेव्हा कारमध्ये अधिअधिक एक्सेसरीजचा वापर केला जातो तेव्हा काही समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढते. कंपनीकडून देण्यात आलेल्या एक्सेसरिजमध्ये अनेकजण बदल करतात. यावेळी वायरिंगमध्ये काही बदल झाल्यास धोका वाढतो. गाडीची खरेदी केल्यानंतर मॅकेनिककडून गाडीमध्ये इतर पार्ट बसवून घेणं प्रकर्षाने टाळावं. बऱ्याचदा चालू गाडीमध्ये आग लागल्याच्या दुर्घटनाही घडल्या आहेत. यासाठीच अशा दुर्घटनांपासून वाचण्यासाठी कोणती काळजी घ्यावी. तसंच या दुर्घटना घडल्यास काय करावं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  1. तारांचं गरम होणं- अनेकदा उन्हाळ्यात तापमान वाढल्याने कारमधील काही बारीक तारा गरम होवून एकमेकांना चिकटतात. तारांवरील रबर वितळल्यानी स्पार्किंग होवून शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता वाढते. यामुळे कारमध्ये आग लागण्याची शक्यता वाढते.  तसचं तारांमधील लूज कनेक्शनमुळेही शॉर्ट सर्किट होवून आग लागण्याचा धोका वाढतो. car fire safety

  2. लोकल मॅकेनिककडून सर्विसिंग टाळावी- अनेकदा गाडीची अधिकृत कंपनीच्या सेंटरमधून सर्विसिंग न करता अनेकजण लोकल मॅकेनिककडून गाडीची सर्विसिंग करून घेतात. लोकल किंवा शिकाऊ मॅकेनिककडून एखादी चूक होण्याची शक्यता असते. यामुळे आग लागण्याची शक्यता बळावते.

  3. अधिकृत डिलरकडूनच CNG/LPG टँकची जोडणी करावी- अनेकदा गाडीच्या खरेदीनंतर गाडीत CNG किंवा LPG टँक बसवला जातो. यावेळी तो अधिकृत मान्यताप्राप्त किंवा ओईएम प्रमाणित डीलरकडूनच बसवून घेण्यास प्राधान्य द्यावं. लोकल गॅरेजमधून हे किट बसवून घेतल्यास टँक लिकेजचा धोका वाढू शकतो. यामुळे गाडीत आग लागण्याची समस्या निर्माण होवू शकते. कंपनीकडून बसवण्यात आलेल्या सेलेंडरवर ऑटोमॅटिक रेग्युलेटर आणि चेकवॉल बसवण्यात आलेलं असतं. त्यामुळे लिकेज किंवा इतर समस्या निर्माण झाल्यास चेकवॉल आपोआप उघडून सिलेंडरमधून गॅस बाहेर पडतो. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची जोखिम कमी होते. Safety Tips When Car Caught Fire

    हे देखिल वाचा-

कारची काळजी
Car AC Problems : गाडीतला AC लवकर थंड होत नाही? फक्त एक ट्रिक सोडवेल प्रॉब्लेम...

4. गाडीचा मेंटेनेंस गरजेचं- अनेकजण गाडीचा योग्यवेळी मेटेनेंस करत नाही. ठराविक किलोमीटरनंतर गाडीचा मेंटेनेंस करणं गरजेचं असतं. याकडे दूर्लक्ष झाल्यास गाडीत बिघाड होवून आग लागण्याची शक्यता वाढते. Car maintenance 

5. इंजिन अधिक गरम होणं- उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गरमीमळु तसचं कार अनेक तास सलग चालल्यामुळे इंजिनचं तापमान अधिक वाढतं. यामुळे कारमध्ये आग लागण्याची जोखिम अधिक वाढू शकते. 

6. अधिक एक्ससरिज लावू नये- अनेकजण गाडी खरेदी केल्यानंतर गाडीमध्ये अनेक एक्ससरिज बसवून घेतात. यात वेगळे स्पीकर्स, लाईटस् बसवल्या जातात. यामुळे वायरिंगवर अनावश्यक दबाव येतो आणि आग लागण्याची शक्यता वाढते. 

कारला आग लागल्यानंतर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

  • कारला आग लागल्यानंतर कारमधून लगेचच बाहेर पडा. 

  • Fire Extinguisher चा उपयोग करा.

  • बोनट उघडू नका

  • ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क करा आणि इतर गाड्यांना अर्लट देण्याचा प्रयत्न करा. 

  • गाडीला आग लागल्यानंतर काही वेळा दारं लॉक होण्याची शक्यता असते. यासाठी काच फोडण्यासाठी गाडीच्या सेफ्टीकीटमधील हतोडा कायम हाताजवळ असेल याची काळजी घ्या. 

गाडीची वेळोवेळी सर्विसिंग करणं आणि मेंटेनेंस करणं हे अधिक गरजेचं आहे. कधीही खबरदारी घेणं हे अधिक महत्वाचं आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com