
देशभरात मकरसंक्रांतीचा हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या सणाला फार मोठी परंपरा आहे. या सणानिमित्त अनेक ठिकाणी आपल्याला पतंग, मांजा, तीळाचे लाडू, पुरण पोळी व इतर अनेक गोष्टी पाहायला व चाखायला मिळतात. सण म्हटला की नातेवाईक, मित्रमंडळींना शुभेच्छा देणंही आलं. आजकाल व्हॉट्सअपच्या माध्यमातून शुभेच्छा देणं फार सोपं झालं आहे.
नवविवाहित दांपत्यांसाठी हा दिवस खास असतो. या दिवशी सुहासिनी हलव्याचे दागिने परिधान करतात. आनंद आणि समृद्धीचे प्रतीक असलेला मकर संक्रांती हा सण सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरा केला जातो. तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला मकर संक्रांतीनिमित्त सुंदर स्टेटस ठेवू शकता आणि तुमचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही पाठवू शकता.
1. म… मराठमोळा सण
क… कणखर बाणा
र … रंगीबिरंगी तिळगुळ
सं… संगीतमय वातावरण
क्रा… क्रांतीची मशाल…
त …तळपणारे तेज
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.
2. एक तिळ रुसला, फुगला,
रडत रडत गुळाच्या पाकात पडला,
खटकन हसला हातावर येताच बोलू लागला,
तिळगुळ घ्या गोड गोड बोला.
3. तिळाची गोडी, प्रेमाची माडी,
माडीचा जिना, प्रेमाच्या खूणा, मायेचा पान्हा,
साऱ्यांच्या मना, म्हणूनच एक तीळ सात जना,
मकर सक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
4. तुमचे आयुष्य सूर्याच्या किरणांप्रमाणेच,
सुखाने आणि भरभराटीने भरून जावो,
मकर संक्रांत तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो.
5. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण,
घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
6. कणभर तीळ मनभर प्रेम
गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…
मकर संक्रांतीच्या आपणास व
आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
7. आठवण सूर्याची, साठवण स्नेहाची,
कणभर तिळ, मनभर प्रेम,
गुळाचा गोडवा, स्नेह वाढवा,
तिळ गुळ घ्या आणि गोड गोड बोला….!
मकरसंक्रांतीनिमीत्ताने तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा !!!
8. नवा काळ, नव्या दिशा,
नवी उमेद, नवीन आशा,
विसरा आता दुःखे सारी सारी,
पतंगासवे घ्या आकाशी उंच भरारी..
9. तिळाची उब लाभो तुम्हाला,
गुळाचा गोड़वा येवो जीवनाला,
यशाची पतंग उड़ो गगना वरती,
तुम्हास अणि तुमच्या परिवारास..
SHUBH SANKRANTI!
10. सण गोडवा जपण्याचा, सण स्नेहभाव वाढविण्याचा..
सर्वांना मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा!!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.