esakal | घरीच बनवा रोज जेल आणि मिळवा सुंदर केस आणि त्वचा
sakal

बोलून बातमी शोधा

 rose gel

घरीच बनवा रोज जेल आणि मिळवा सुंदर केस आणि त्वचा

sakal_logo
By
अर्चना बनगे

कोल्हापूर: उन्हाळ्याच्या दिवसात केसांना आणि त्वचेला हायटेक ठेवण्यासाठी घरीच बनवा  फुलाचे गुलाबजल.कडक ऊन, घाम,धुळ आणि माती त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा आणि केसांवरती खूप मोठा परिणाम होतो. या सिझनला त्वचेची काळजी जर नाही घेतली तर ती कोरडी आणि बेजार होते. तशाच पद्धतीने केसांचे देखील खूप हाल होतात आणि ती केस ड्राय पडतात. म्हणून समर सीजनला केस आणि त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते.

या दिवसांमध्ये खाण्याबरोबरच केसांना आणि त्वचेला वॉटर बेस्ट ट्रीटमेंट सुद्धा गरजेची असते.मार्केटमध्ये खूप प्रॉडक्ट तुम्हाला मिळतील जे या दिवसांमध्ये फायदेशीर ठरतील. मात्र घरी तयार केलेले रोज वॉटर अगदी फ्री मध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि तुमच्या केसांची त्वचेची काळजी देखील घेईल.

असे तयार करा घरच्या घरी गुलाबजल

एक कप रोज पेटल्स

एक मोठा चमचा एलोवेरा जेल

अर्धा चमचा बदाम तेल,

एक विटामिन ई कॅप्सूल

तयार करण्याची पद्धत

सगळ्यात पहिल्यांदा रोज पेटला पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. शक्यतो फ्रेश गुलाबाचा वापर करा.आता मिक्सर ग्राइंडर मध्ये घाला. गुलाब पेटल तयार करण्यासाठी दुधाचा वापर करून ते मिक्स करू शकता. मात्र जर दुधाचा वापर करणार असाल तर दोनते तीनच दिवस वापर करू शकता. यासाठी बेस्ट ऑप्शन गुलाब मध्ये दूध घालू नका.आता वाटलेल्या गुलाबाचा रस काढून द्या. यामध्ये बदामाचे तेल, विटामिन ई घाला आणि चांगल्या पद्धतीने मिश्रण तयार करून घ्या. आता यामध्ये एलोवेरा जेल घाला. आता हे मिश्रण एअरटाईट डब्यामध्ये घालून ठेवा.आता या मिश्रणाला दहा दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा. आणि केस आणि त्वचेवरती ट्राय करा.

केसांसाठी रोज जेल चे फायदे

गुलाबाच्या फुलाचे जेल स्कल आणि हेल्थला खूप फायदेमंद आहे. हे स्कलला फंगल इन्फेक्शन पासून दूर ठेवते.

loading image