कोळसा, कुंकवाचा वापर करुन तयार करा नैसर्गिक आयलाइनर, पाहा कसे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Natural Eyeliner Use Charcoal and kumkum

कोळसा, कुंकवाचा वापर करुन तयार करा नैसर्गिक आयलाइनर, पाहा कसे?

तुमचा लुक अधिक ग्लॅमरस बनवण्यासाठी तुम्ही बऱ्याचवेळा वेगवेगळ्या ट्रिक्स वापरत असता. जेव्हा तुम्ही मेकअप करता तेव्हा गडद दिसणारे आयलायनर वापरता. मात्र अनेकवेळा आयलायनर लावल्यानंतर अनेक मुलींना साइड इफेक्ट्स होतात. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आयलायनरमध्ये अनेक रसायने असतात. अशा मुलींनी किंवा महिलांनी नैसर्गिक आयलायनर लावणे हाच उत्तम मार्ग आहे. नैसर्गिक आयलायनर लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते तुमचे डोळे सुंदर बनवतात. आणि डोळ्यांची काळजी घेतात. केमिकल लायनर लावल्याने तुमच्या पापण्या कमकुवत होतात शिवाय डोळ्यावर काळी वर्तुळेही होऊ लागतात.

हेही वाचा: प्रो कबड्डीला आजपासून सुरुवात; 'या' पाच गोष्टी माहिती आहेत का?

कोळश्याचा आयलाइनर

घरी बनवलेल्या काळ्या आयलायनरमध्ये कोळसा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हे नारळ आणि बदाममध्ये मिसळले जाते. आयलाइनरसाठी एका लहान भांड्यात दोन कॅप्सूल किंवा अर्धा चमचा सक्रिय चारकोल ठेवा. यानंतर त्यात काही थेंब पाणी टाकून ते मिक्स करा. त्यानंतर पातळ मेकअप ब्रशच्या मदतीने आयलायनर लावा. तुम्ही हे लाइनर 10-15 दिवस वापरू शकता.

कुमकुम आयलाइनर

तुम्हाला तुमचा क्लासी किंवा पारंपारिक लुक दाखवायचा असेल तर यासाठी डीप रेड आयलायनर योग्य पर्याय आहे. त्वचेचा टोन किंवा रंग कोणताही असो ते लगेच चेहऱ्यावर चमक आणत असतो. यासाठी एका लहान भांड्यात एक चमचा कुमकुम पावडर टाका. त्यात गुलाब किंवा नारळाच्या पाण्याचे काही थेंब घालून ते एकत्र मिसळा. हे तयार करत असताना जाड ठेवा. ब्रशच्या मदतीने ते आयलायनर म्हणून वापरा. तुम्ही 10 ते15 दिवसांसाठी हे वापरू शकता.

हेही वाचा: प्रसिद्ध अभिनेत्री ललिथा यांचे निधन, 550 चित्रपटात केल्या भूमिका