
पुणे : मेकअप आपला लुक फक्त सुंदर बनवत नाही तर त्याद्वारे आपण बरेच वेगवेगळे लुक्स देखील सहज तयार करू शकता. एवढेच नव्हे तर आजकाल मेक-अप करण्याची पध्दत देखील काळानुसार खूपच बदलली आहे. आजकाल नो मेकअप लुक ते डेवी Dewy मेकअप लूक केला जातो पण जुन्या काळात मेकअप करण्याची पद्धत पुर्णपणे वेगळी होती.
त्या काळात हेअर स्टाईल, काजळ आणि लाइनर हे खूप वेगळ्या प्रकारे केले जात असे, ज्यामुळे तुम्हाला अगदी वगळाच लुक मिळायता. पण आता तुम्हाला देखील रेट्रो लुक पुन्हा तयार करायचा असेल तर बरेच काही करण्याची आवश्यकता नाही काही सोप्या टिप्स वापरुन तुम्ही अगदी सहज रेट्रो लुक करु शकता.
त्यासाठी आपल्याला आपल्या मेकअप आणि केसांच्या स्टाईलकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. आज आपण काही टिप्स जाणून घेणार आहोत, ज्या वापरुन तुम्ही सहजपणे रेट्रो लुक पुन्हा तयार करू शकता-
लाल लिपस्टिकचा वापर
मेकअप करताना तुम्ही बरेच रंग आणि शेड्स वापरत असाल, पण आपल्याला रेट्रो लुक पुन्हा तयार करायचा असेल तर चेरी रेड लिपस्टिक लावणे हा एक उत्तम पर्याय आहे. लाल लिपस्टिक लावल्याने तुम्हाला ताबडतोब रेट्रो लुक मिळेल. तसेच प्रत्येक वेळी रेट्रो लूकमध्ये चेरी रेड लिपस्टिक लावणेच गरजेचे नाही. तुमची इच्छा असल्यास आपण गुलाबी रंगात वेगवेगळ्या छटा देखील वापरू शकता. हे आपल्याला रेट्रो लूकमध्ये एक सुंदर लुक देईल.
आयलाइनरवरही लक्ष केंद्रित करा
जर आपल्याला खरोखर सुंदर रेट्रो लुक पुन्हा तयार करायचा असेल तर आपल्याला आपल्या मेकअपवर विशेषत: आयलाइनरवर लक्ष केंद्रित करावे लागेल. जर काळजीपुर्वक पाहिले तर तुमच्या लक्षात आले असेल रेट्रो लूकमध्ये आयलायनर थोडा जास्त लांब ठेवला जातो. परंतु जर आपण तशाच प्रकारे लाइनर लावत असाल तर ते थोडे विचित्र वाटेल. अशा वेळी आपण विंगटिप आयलाइनर लावणे चांगले . हे छान दिसते आणि आपल्याला एक सुंदर रेट्रो लुक देते.
ड्रामॅटिक लुक हवा असेल तर...
जर तुम्हाला रेट्रो लुक सोबत थोडा ड्रामॅटिक टच द्यायचा असेल. तर ही मेकअप ट्रिक तुम्हाला निश्चितपणे उपयुक्त ठरू शकते. तुम्हाला अशा लुकसाठी फक्त फेक आयलॅशेस वापराव्या लागतील . फेक आयलॅश आपल्या डोळ्यांना फुलर लुक देतात. रात्रीच्या वेळेस आपण गडद लिपस्टिक शेडसह या आयलॅशेस परफेक्ट दिसतील. रेट्रो लुक तयार करताना आपल्या मेकअपसह तुम्ही ओव्हरबोर्ड जाणार नाहीत याची काळजी घ्या जेणेकरुन तुम्ही अति बोल्ड किंवा ओव्हर ड्रामॅटिक दिसणार नाहीत.
केसांवरही देखील लक्ष द्या
जर आपण रेट्रो लूक पार्टीसाठी तयार होत असाल आणि आपल्या लूकमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नको असेल तर आपण आपल्या केसांवर तितकेच लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. त्याशिवाय आपल्याला परिपूर्ण रेट्रो लुक मिळू शकणार नाही.जर आपले केस रेट्रो लुकमध्ये लहान असतील तर आपण हेडबँडने पफ बनवून सुंदर लुक मिळवू शकता. या व्यतिरिक्त रेट्रो लूकमध्येही bouffant देखील चांगला दिसतो. लक्षात ठेवा की परफेक्ट केसांशिवाय तुम्ही कधीही बेस्ट रेट्रो लुक करू शकणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.