मी आत्ता जिथं राहते, तिथं शेजारी माझी हक्काची मावशी राहायला आली आहे. सख्खी नसली तरी हक्काची आहे. लहानपण तिच्याबरोबर सर्वाधिक वेळ घालवता आलं. तिच्या अभ्यासाच्या शिस्तीमुळे अभ्यासाची गोडी लागत गेली. आत्ता ती पुन्हा माझी शेजारीण झाली आहे.
दीडएक वर्षापूर्वी कबीरला घेऊन मी तिच्या घरी गेले होते, तेव्हा कबीरच्या हातात कुठून कुठून जमा केलेली कागदाची कार्डं होती. तो तिकडे विसरून आला. या गोष्टीला दीड वर्ष लोटलं. नंतर जेव्हा आम्ही तिच्या नव्या घराला भेट द्यायला गेलो, तेव्हा तिनं ती कबीरला परत दिली. तिच्या पर्समध्ये चक्क दीड वर्ष जपून ठेवली होती.