Parenting Tips: मुलांना सुट्टीमध्ये नातेवाईकांच्या घरी घेऊन जात असाल तर आधी 'या' गोष्टी शिकवा

Parenting Tips: आपलं मूल हे लहानपणापासूनच हुशार असावं, आणि त्याच्यामुळे चारचौघांत आपली थट्टा होऊ नये असं सगळ्याच पालकांना वाटतं. पण अनेक पालक या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.
Parenting Tips:
Parenting Tips: Sakal

manners etiquette for your child while going relatives home

मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे. या दिवसांमध्ये अनेक लोक मुलांना फिरायला घेऊन जातात. मुलांच्या सुट्ट्यांमध्ये नातेवाईकांच्या घरी जाण्याचा प्लॅन केला जातो. आपलं मूल हे लहानपणापासूनच हुशार असावं, आणि त्याच्यामुळे चारचौघांत आपली थट्टा होऊ नये असं सगळ्याच पालकांना वाटतं. पण अनेक पालक या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे मुले खूप हट्टी होतात आणि नातेवाईकांसमोर पालकांची थट्टा उडते. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला कोणत्या गोष्टी शिकवल्या पाहिजेत हे जाणून घेऊया.

कोणाची वस्तू घेण्यापूर्वी विचारणे

अनेक मुले नातेवाई किंवा इतर कोणच्याही घरी गेले तर त्यांचा मोबाईल न विचारता घेतात. तसेच इतर वस्तू देखील न विचारता घेतात. यामुळे पालकांनी मुलांना नीट शिकवा की कोणाच्याही घरी गेल्यावर कोणत्याही सामानाला न विचारता हात लावू नये. तसेच कोणी नकार दिल्यास पुन्हा मागण्याचा हट्ट करू नये.

आभार मानने

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लोकांचे आभार मानायला शिकवावे. प्रत्येक मुलाला ही सवय असली पाहिजे. मुलांना कोणी काही दिले असेल तर त्याबद्दल आभार मानावे.

मोठ्यांना उलट बोलणे

आजकालची मुले मोठ्यांना सहज उलटून उत्तर देतात. यामुळे मुलांना शिकवले पाहिजे की त्यांना मोठ्यांना कधीही उलट उत्तरे देऊ नये. मोठ्या लोकांशी नेहमी आदरयुक्त आणि नम्रपणे बोलावे.

Parenting Tips:
Aplastic Anemia: ऊठसूट गोळ्या घेऊ नका...अतिसेवनाने होऊ शकतो जीवघेणा ‘अप्लॅस्टिक अ‍ॅनेमिया’

सामान नीट जागेवर ठेवावे

मुलांना सामान नीट ठेवण्याची सवय लावावी. जर मुलांनी एखाद्याच्या घरात जाऊन सामान पाहण्यासाठी उचलले असेल तर पुन्हा त्याच जागी ठेवायाला शिकवावे.

जंक फूड खाण्यास टाळावे

जेव्हा आपण कोणाकडे जातो तेव्हा भरपुर स्नॅक्स आणि जंक फूड खायला देतात. तुम्हीही खुठे जात असाल तर तुमच्या मुलांना जास्त जंक फूड खाण्यास नकार द्यावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com