Car Battery केव्हा बदलावी, या टिप्सच्या मदतीने वाढवा कारच्या बॅटरीचं लाइफ

काही छोट्या आणि सहज शक्य असलेल्या टिप्सच्या मदतीने बॅटरीचं लाइफ वाढवणं शक्य आहे, या टिप्स कोणत्या आणि कारची बॅटरी नेमकी कधी बदलावी याबद्दल जाणून घेऊ यात
कारच्या बॅटरीचा मेंटेनन्स
कारच्या बॅटरीचा मेंटेनन्सEsakal

कारची वेळोवेळी देखभाल करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कारमधील प्रत्येक पार्ट हा अतिशय महत्वाचा आहे. कारमधील एखादा पार्ट Car Parts जरी बिघडला तरी कार चालवताना समस्या निर्माण होवू शकतात. Marath Tips How to increase life of your car battery

एवढचं नव्हे तर काही पार्टमध्ये बिघाड निर्माण झाल्यास कार सुरुच होत नाही. यासाठीच कारचा मेंटेनन्स Car mainteinance गरजेचा असतो. अनेकजण कारचा वेळोवेळी मेंटेनन्स करतात. कार चांगली रहावी यासाठी चांगल्या प्रतीच्या इंधनाचा वापर करतात.

तसंच वेळोवेळी इंजिन ऑइल बदलणं, टायरमधील हवा चेक करणं या गोष्टींची दखल घेतात. मात्र अनेकजण कारच्या बॅटरीकडे Car Battery दुर्लक्ष करतात. या मागचं कारण म्हणजे कारच्या बॅटरीला जास्त मेंटेनन्सची आवश्यकता नसते. मात्र बॅटरीची योग्य काळजी न घेतल्यास ती लवकर खराब होवू शकते.

काही छोट्या आणि सहज शक्य असलेल्या टिप्सच्या मदतीने बॅटरीचं लाइफ वाढवणं शक्य आहे, या टिप्स कोणत्या आणि कारची बॅटरी नेमकी कधी बदलावी याबद्दल जाणून घेऊयात.

कारची बॅटरी साधारण ५-७ वर्ष सहज चालते. अर्थाच तुम्ही बॅटरीची काळजी कशी घेता यावरही अनेकदा कार बॅटरीचं लाइफ ठरतं. जर तुम्ही योग्य प्रकारे काळजी घेतलीत तर कारची बॅटरी काही वर्ष अधिकही चालू शकते. यासाठी तुम्हाला कारच्या बॅटरीची योग्य देखभाल करणं गरजेचं आहे.

कार बॅटरी बिघडण्याचं कारण

कारची बॅटरी जास्त दिवस चालण्यासाठी ती सतत चार्ज होत राहणं गरजेचं आहे. अर्थात कार जेव्हा सुरु असते तेव्हा ही बॅटरी चार्ज होत असते. मात्र अनेकजण फार कमी वेळा कार चालवतात. कार अनेक दिवस पार्किंगमध्ये उभी करुन ठेवली जाते. अशा वेळी कार जास्त वेळ सुरू न राहिल्याने बॅटरी डेड होते. परिणामी कार सुरू होण्यास अडचण निर्माण होते. Car

त्याचप्रमाणे अनेकदा उष्ण वातावरणाचा देखील कारच्या बॅटरीवर परिणाम होतो. उष्ण किंवा गरम वातावरणात थंड वातावरणाच्या तुलने बॅटरी बिघडण्याची शक्यता अधिक असते. तसचं बॅटरी ओव्हर चार्ज झाल्याने देखील बिघडू शकते. ncrease Car Battery Life

हे देखिल वाचा-

कारच्या बॅटरीचा मेंटेनन्स
Car Care Tips : गाडीतील Engine Oil बदलणं का आहे गरजेचं?

वाढवा कारच्या बॅटरीचं लाइफ

कारच्या बॅटरीचं लाइफ वाढावं यासाठी ती वेळोवेळी चार्ज होणं गरजेचं आहे. यासाठी आठवड्यातून एकदा तरी कारने एक फेरफटका मारणं गरजेचं आहे. यामुळे बॅटरी चार्ज होईल आणि ती डे़ड होणार नाही. तसंच कारचे इतर पार्टही चांगले राहण्यास मदत होईल.

बॅटरीच्या टर्मिनलमध्ये घाण साचल्यास ती स्वच्छ करण्यासाठी ब्रशचा वापर करा. त्याचसोबत तुम्ही पाण्यामध्ये बेकिंग पावडर मिसळून या पाण्याने देखील बॅटरी स्वच्छ करू शकता.

कार एकाच ठिकाणी उभी असताना कारच्या बॅटरीवर कमीत कमी उपकरणं सुरू ठेवा. ज्यामुळे बॅटरीवर जास्त लोड येणार नाही. अनेकजण कारमध्ये थांबून एसी, म्युझिक सिस्टम किंवा हेडलाईट सुरू ठेवतात. यामुळे बॅटरी लवकर उतरू शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com