Mehendi मध्ये या ४ गोष्टी टाका आणि पहा कमाल, Soft आणि silky केसांसाठी खास हेअर पॅक

Mehndi Hair Pack: हिना मेहंदीतील पोषक तत्त्वांमुळे केसांना आणि केसांच्या मुळांना पुरेसे पोषण मिळतं ज्यामुळे केस गळती Hair Fall देखील कमी होते
How to make Mehndi hair pack at home
How to make Mehndi hair pack at homeEsakal
Updated on

Mehndi Hair Pack: केसांना नैसर्गिकरित्या कलर Hair Color करण्यासाठी तसंच केसांची चमक वाढवण्यासाठी मेहंदी हा एक उत्तम पर्याय आहे. Marathi Beauty Tips Benefits of Hina Mehendi Pack for Hair Conditioning

हिना मेहंदीचे Mehendi केसांसाठी अनेक फायदे आहेत. पांढरे केस कलर करण्यासोबतच केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनिंग Hair Conditioning करण्यासाठी देखील हिना मेहंदी उपयुक्त ठरते. निर्जीव आणि निस्तेज केसांना पुन्हा मजबूत आणि दाट करण्यासाठी हिना मेहंदीचा वापर फायदेशीर ठरू शकतो.

हिना मेहंदीतील पोषक तत्त्वांमुळे केसांना आणि केसांच्या मुळांना पुरेसे पोषण मिळतं ज्यामुळे केस गळती Hair Fall देखील कमी होते आणि केसांच्या अनेक समस्या दूर होतात. याच हिना मेहंदीत जर काही इतर वस्तूंचा समावेश केला तर त्याचा फायदा दुप्पट होऊ शकतो.

मेहंदीमध्ये आणखी चार वस्तू मिसळल्याने तुमच्या केसांना अधिक फायदा होऊ शकतो. या वस्तू कोणत्या आणि त्याचा वापर कसा करावा याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हे देखिल वाचा-

How to make Mehndi hair pack at home
Mehendi on Hair : केसांना मेंदी लावताना या गोष्टी चुकूनही करू नका

असा तयार करा मेहंदीचा हेअर मास्क(How to make Mehndi hair pack at home)

- एका वाडग्यात मेहंदी पावडर घ्या.

- त्यानंतर एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी तापवत ठेवा. यामध्ये एक चमचा कॉफी, एक चमचा चहापत्ती टाका. तसंच या पाण्यात दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं टाका.

- या पाण्याला चांगली उकळी येऊ द्या. पाणी थोडं गार झाल्यावर हे पाणी गाळून मेहंदीमध्ये टाका.

- या तयार पाण्यामध्ये मेहंदी चांगली मिक्स करा. त्यानंतर यामध्ये एक अंड फोडून टाका. सर्व मिश्रण चांगलं मिसळून घ्या. तयार झालेला मेहंदीचा मास्क रात्रभर झाकून ठेवा.

तयार मेहंदी हेअर पॅक सकाळी केसांना लावा. त्यानंतर २ तासांनी केस सौम्य शॅम्पूने स्वच्छ धुवा. दर १५ दिवसांनी हा हेअर पॅक केसांना लावल्याने तुम्हाला केस मुलायम, चमकदार आणि मजबूत झाल्याचं दिसून येईल.

मेहंदीचे फायदे(Benefits of mehendi)

मेहंदी हा केसांसाठी एक सगळ्यात स्वस्त आणि नैसर्गिक असा हेअर डायचा Hair Dye पर्याय आहे. शिवाय घरच्या घरी तुम्ही सहज केसांना मेहंदी लावू शकता. यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही.

मेहंदी लावल्याने पांढरे केस कलर होण्यास मदत तर होतेच शिवाय यामुळे अकाली पांढऱ्या होण्याऱ्या केसांची समस्या देखील कमी होते.

मेहंदी एक नैसर्गिक हेअर कंडिशनर आहे. मेहंदीमधील विटामिन ई आणि टॅनिनमुळे केस मऊ होतात. मेहंदी धुतल्यानंतर केस वाळवावे आणि केसांना चांगलं तेल लावल्यास केस अधिक सॉफ्ट आणि सिल्की होतील.

मेहंदी लावल्याने स्कॅल्पच्या समस्या दूर होतात. यामुळे स्कॅल्पचं pH संतुलित राहतं.

तुमचे केस जास्त तेलकट असतील तर मेहंदीमध्ये २ चमचे मुलतानी माती टाका. यामुळे चिकट आणि तेलकट केसांची समस्या दूर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com