Marathi Film Industry: मातीशी पुन्हा जुळलेली ‘नाळ’

Actress Reveals the Story Behind Her Parvati Role in Naal: ‘नाळ’मधील पार्वतीची भूमिका कशी मिळाली? अभिनेत्रीने सांगितला आयुष्यातील कठीण काळाचा अनुभव
Naal Marathi Movie Parvati Role Became a Turning Point in Actress Career and Gave Her a New Identity in Marathi Cinema

Naal Marathi Movie Parvati Role Became a Turning Point in Actress Career and Gave Her a New Identity in Marathi Cinema

sakal

Updated on: 

-दीप्ती देवी, अभिनेत्री

माझ्या अभिनयाच्या कारकिर्दीत मला मराठी चित्रपटसृष्टीत खरी ओळख मिळाली ती ‘नाळ’ या चित्रपटामुळे. त्यामुळे या चित्रपटातील पार्वतीची भूमिका माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या भूमिकेने मला केवळ ओळखच दिली नाही, तर अभिनयाकडे पाहण्याचा एक नवा दृष्टिकोनही दिला.

‘नाळ’ चित्रपटातील पार्वतीची भूमिका मला कशी मिळाली, याची एक वेगळी गोष्ट आहे. या क्षेत्रातील माझे मित्र ओंकार बर्वे यांनी मला या चित्रपटाबद्दल सांगितले आणि लूक टेस्ट देण्याचा सल्ला दिला. त्या वेळी माझ्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार सुरू होते. माझ्यात आत्मविश्वास नव्हता. मी घराबाहेर पडणेही टाळत होते. मात्र, मित्रांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मी भेटायला गेले.

Loading content, please wait...