Margashirsha Guruvar Vrat : मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करणाऱ्यांनी अवश्य पाळावेत हे नियम, घराची होईल भरभराट
मार्गशीर्ष महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. विशेषतः या महिन्यातील गुरुवारचा व्रत महिलांसाठी महत्त्वपूर्ण आहे. सुख, शांती, समृद्धी, व परिवारातील ऐक्यासाठी हे व्रत केले जाते. परंतु व्रत करताना काही नियमांचे पालन केल्यास त्याचा लाभ अधिक होतो
मार्गशीर्षातील गुरुवार धरणा-या महिलांनी ही पूजा करताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. मार्गशीर्षातील गुरुवारचे व्रत धरणा-या महिलांसाठी या व्रताच्या पूजेची मांडणी, वैभवलक्ष्मीची पूजा, कथेचे पठण करणे या गोष्टी महत्वाच्या आहेत.