मार्क झुकरबर्ग नेहमी एकसारख्या कपड्यात का दिसतो ?स्वत:च सांगितले कारण

mark zukeberg
mark zukebergsakal media

बहुतके यशस्वी लोक त्यांच्या व्यवसायाची इतर ठिकाणी मागणी होत नाही तोपर्यंत तेच कपडे घालतात, हे तुम्ही पाहिलेय का? मार्क झुकरबर्गला मानसिक उर्जा मिळण्यासाठी तेच कपडे घालणे आवडत असल्याचे त्याने शेअर केले आहे. मार्कपासून रतन टाटा, स्टीव्ह जॉब्स, बराक ओबामा यांच्याकडे अनेक एकसमान कपडे आहेत. त्यात ब्लॅक पुलओव्हर्स, टी शर्ट, ग्रे सूट आणि जीन्सचा समावेश असतो. मार्क झुकरबर्गनी त्याची कोणती कारणे आहेत ती शेअर केली आहेत.

clothes
clothessocial media

काय घालायचे याचा ताण - तुम्ही जे कपडे निवडले आहेत ते फॉर्मल आहेत कि कॅज्युअल? हा प्रश्न तुम्हाला अनावश्यक ताण देतो. हा प्रश्न यशस्वी लोकं सहज टाळू शकतात.

वेळेचा अपव्यय- जेव्हा आपल्याकडे खूप कपडे असतात तेव्हा आपण त्यापैकी कोणते कपडे घालायचे याविषयी गोंधळलेले असतो. पण जर तुमच्या वॉर्डरॉबमध्ये काळा टि शर्ट आणि त्याच रंगाची जिन्स असेल तर त्यात विचार करण्यासारखं काही नसतं. तुम्ही तुमचा वेळ वाचवून उत्पादनक्षमता वाढवाल.

खर्च वाचतो- जेव्हा तुम्ही रोज एकाच लूकमध्ये असता तेव्हा साहजिकच तुमचे पैसे वाचतात. तुम्ही असे कपडे सेलमधूनही घेतलेले असाल कारण तुम्हाला माहिती आहे की त्याची किंमत तीच आहे. आपले कपडे आणि टॉप्स सर्वांची किंमत वेगवेगळी आहे.

कपड्यांची गुणवत्ता - जेव्हा तुम्ही एकच गोष्ट सारखी घालणार असता तेव्हा कपड्याची गुणवत्ता महत्वाची ठरते. जो ब्रॅंड तुम्हाला चांगला वाटतो, जे तुमच्यासाठी योग्य आहे तिथून महाग आणि दर्जेदार कपडे खरेदी केल्यावर ते लक्षात येईल. यामुळे तुमचा आत्मविश्वास तुमच्या चेहऱ्यावर झळकेल.

वैशिष्ट्यपूर्ण दिसणे - जेव्हा तुम्ही एकच कपडे रोज घालता तेव्हा इतर 100 लोकांपेक्षा तुम्ही नक्कीच वेगळे दिसता. लोकं तुमच्याकडे लक्ष देतात आणि एक पावरफूल लूक देता. ते तुम्हाला त्यांच्या प्रतिमेचे प्रतिनिधी (iconic representation )मानतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com