विवाह समुपदेशन का करायचं? जाणून घ्या कारणं | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विवाह समुपदेशन का करायचं? जाणून घ्या कारणं
विवाह समुपदेशन का करायचं? जाणून घ्या कारणं

विवाह समुपदेशन का करायचं? जाणून घ्या कारणं

sakal_logo
By
टीम ई सकाळ

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा टप्पा असतो. त्यामुळे जोडप्यांना एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तसेच वैवाहिक जीवन सुरळीत राहण्यासाठी विवाह समुपदेशनाची खूप मदत होऊ शकते. या समुपदेशनाद्वारे जोडप्याला त्यांच्यातील मतभेद- वाद सोडविण्यासाठी समुपदेशक मदत करतात. याचा फायदा त्यांचं नातं सुधारण्यासाठी होऊ शकतो.लग्न करताना ज्या गोष्टी उघडपणे बोलणं आवश्यक असतं तेच बोलणं टाळण्याचा काही जोडपी प्रयत्न करतात. अशा गोष्टी किंवा समस्या मनमोकळेपणानं मांडायला विवाह समुपदेशक एक वेगळी दिशा देतात. भिन्न लैगिक प्रवृत्तीच्या जोडप्यांसाठी विवाह समुपदेशन परिणामकारक ठरतं. केवळ विवाहित जोडपीच नाही तर लग्न करण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्तीही समुपदेशनाची मदत घेऊ शकतात.

We Are In This Together या वेबसाईटवर विवाह समुपदेशनाविषयी माहिती मिळेल.

विवाहपूर्व समुपदेशन- लग्न कशासाठी करत आहात हे समजून घेण्यासाठी विवाहपूर्व समुपदेशन फायद्याचे ठरते. साखरपुडा होऊन लग्न जवळ आलेली जोडपी असे समुपदेशन करू शकतात. जोडप्याला लग्नानंतर विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते. त्यात लग्नानंतर विस्तारलेल्या कुटुंबाला समजून घेणे, जबाबदाऱ्यांची वाटणी, लैंगिक गरजा-भूमिका, मुलांचे संगोपन आदी विविध विषयांवर तुम्हाला संवाद साधता येतो. समुपदेशनामुळे जोडप्यांना एकमेकांमधील बलस्थानं आणि उणीवा समजून घेण्यास, त्यावर योग्य मार्ग काढण्यास तसेच एकमेकांना मनापासून स्वीकारण्यास मदत होते.

विवाहोत्तर समुपदेशन- लग्न झालेल्या जोडप्यांसाठी विवाहोत्तर समुपदेशन फायद्याचे आहे. यात तुमच्या लग्नाला किती वर्षे झाली आहेत ही बाब ग्राह्य धरली जात नाही. वैवाहिक जीवनात ज्या जोडप्यांना जोडीदाराची वागणूक, शारीरिक जवळीक, पालकत्वाची जबाबदारी, एकमेकांशी संवाद साधण्यात अडचणी येत असतील तर त्यांना हे समुपदेशन महत्वाचे ठरते. लग्नानंतर एकत्र कुटुंबात मुलीला राहावे लागते. नवऱ्याच्या कुटुंबासोबत राहताना कुटुंबातील इतर सदस्यांच्या वागणुकीमुळे या जोडप्याच्या जीवनात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्या सोडविण्यासाठी विवाह समुपदेशनाची मदत घेता येते.

तुम्हाला विवाह समुपदेशन आणि समुपदेशकाची गरज का आहे?

कोणतेही लग्न परिपूर्ण नसते. लग्न दिर्घकाळ टिकण्यासाठी आणि वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी दोघांकडून खूप प्रयत्न करावे लागतात. या प्रवासात जोडप्यांना काही अडथळ्यांचा सामना करावा लागतो. त्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी विवाह समुपदेशन आणि समुपदेशक मदत करू शकतात. तुम्ही खालील कारणासाठी विवाह समुपदेशकाची भेट घेऊ शकता.

1) ते तुम्हाला मनमोकळेपणाने संवाद साधण्यास प्रोत्साहन देतात.

2) तुमच्यात संघर्ष होऊ नये यासाठी एकमेकांचा दृष्टीकोन समजून घेण्यास ते मदत करतात.

3) जोडप्याने तर्कशुद्ध आणि वास्तववादी विचार करावा यासाठी समुपदेशक मदत करू शकतात.

4) योग्य निर्णय घ्यायला विवाह समुपदेशक मदत करतात.

5) वैवाहिक जीवनाचे बंध घट्ट करण्यात आणि जर समस्या असतील तर त्या सोडवून पुन्हा एकत्र यायला समुपदेशक मदत करतात.

6) तुमचे नाते अधिक घट्ट करण्यासाठीही समुपदेशन फायद्याचे ठरते.

तुम्हालाही जर समुपदेशन करुन घ्यायचे असेल तर We Are In This Together या वेबसाईटला भेट द्यावी.

loading image
go to top