मोकळे व्हा : विश्‍वास संपला की नाते संपते?

Relationship Advice: Trust, Infidelity and Marriage : वैवाहिक नात्यात विश्वासघात झाल्यानंतर पुन्हा विश्वास निर्माण करणे कठीण असते. विवाहबाह्य संबंध, भावनिक दुरावा आणि घटस्फोटाच्या संभ्रमात असलेल्या जोडप्यांनी संवाद, प्रामाणिकपणा आणि परस्पर आदराला प्राधान्य द्यावे.
Relationship Advice: Trust, Infidelity and Marriage

Relationship Advice: Trust, Infidelity and Marriage

esakal

Updated on: 

डॉ. स्मिता प्रकाश जोशी समुपदेशक

प्रश्‍न : आमच्या लग्नाला १० वर्षे झाली असून आम्हाला ५ वर्षांची मुलगी आहे. आम्ही दोघे नोकरी करतो. पूर्वी आमचा संसार आनंदाने सुरू होता. माझ्या बाळंतपणात पतीची दुसऱ्या गावी बदली झाली. मुलगी लहान असल्याने पतीबरोबर जाणे शक्य नव्हते. तो ४ वर्षे दुसऱ्या गावी राहिला आणि ६ महिन्यांपूर्वी त्याची पुन्हा आमच्या शहरात बदली झाली. आता तो माझ्याशी पूर्वीसारखा मोकळेपणाने बोलत नाही. आमच्यातील शारीरिक जवळीक कमी झाली आहे. मी एकदा त्याचा फोन तपासला व बदलीच्या काळात त्याचे ऑफिसमधील महिला सहकाऱ्याशी जवळचे संबंध निर्माण झाले होते, असे मला समजले. मी विचारणा केल्यावर त्याने सर्व कबूल केले व माफी मागितली. आता तो तिच्याशी असलेले संबंध संपवण्याचा प्रयत्न करीत आहे; मात्र ती त्याला दूर जाऊ देत नाही आणि ब्लॅकमेल करते, असे तो सांगतो. या सगळ्यामुळे पती माझ्या मनातून उतरला आहे. मी त्याला माफ करू शकत नाही. आमच्यात सतत वाद होतात. मी पतीला आणखी एक संधी द्यावी का?

Loading content, please wait...