Married Life : शारीरिक संबंधातला आनंद वाढवायचा आहे? 'हे' व्यायाम नक्की ट्राय करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Married Life

Married Life : शारीरिक संबंधातला आनंद वाढवायचा आहे? 'हे' व्यायाम नक्की ट्राय करा

These Stretches Important For Better Sex Life : शारीरिक संबंध हा शरीराला, मनाला आनंद देणारा भाग असतो. पण बऱ्याचदा आपण त्यातून पूर्ण आनंद घेऊ शकत नाही. दिवसभर कंप्युटर समोर बसून काम, कमी हालचाली याचा परिणाम म्हणजे लवचिकता कमी होते. लोकं बरचसा ताण धरून ठेवतात. त्याचाही शारीरावर परिणाम दिसतो. शरीराची लवचिकता कमी झाल्याने त्याचा परिणाम लैंगिक आयुष्यावरही दिसून येतो.

मोकळेपणाने संपूर्ण आनंद अनुभवत सेक्स करण्यासाठी ही आसनं करणं आवश्यक आहे, याविषयी सोशल मीडिया इंफ्लूएन्सर आणि सेक्सॉलॉजिस्ट पल्लवी बर्नवाल सांगतात...

Bridge Posture

Bridge Posture

सेतू बंधासन (Bridge Posture)

या आसनाने तुमच्या छातीवर, मानेवर आणि कंबरेवर ताण येतो. तुमच्या पाठीची, मांड्यांच्या स्नायूंची क्षमता वाढवतं.

Jaw Massage

Jaw Massage

जॉ मसाज (Jaw Massage)

जबड्याचे स्नायूंना व्यायाम नसल्याने तुमच्या लैंगिक क्रीयेच्या वेळी अडथळा येऊ शकतो. त्या स्नायूंना मसाज करून रिलॅक्स करणं आवश्यक असतं. यामुळे जबड्याबरोबर मान आणि खांद्याचे स्नायूपण रिलॅक्स होतात.

यासाठी तोंड शक्य तेवढं जास्त उघडा. फार ताण देऊ नका. जबड्याच्या जवळ, कानाच्या खालच्या पॉइंट्स जवळ मसाज करा.

Forward Fold

Forward Fold

पुढे वाका (Forward Fold)

हा व्यायाम विशेषतः उंच लोकांसाठी जास्त आवश्यक आहे. शिवाय जे लोक जास्तवेळ एकाच जागी बसून काम करतात, त्यांच्यासाठी पण हा व्यायाम आवश्यक आहे.

टॅग्स :married life