World Maternal Health Day 2025: मातृ सुरक्षा दिन 10 जुलै ला का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व

Why is Maternal Health Day Celebrated on July 10: 10 जुलै रोजी मातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मातृ सुरक्षा दिन साजरा केला जातो.
World Maternal Health Day 2025 | Matru Suraksha Din 2025
World Maternal Health Day 2025 | Matru Suraksha Din 2025sakal
Updated on

थोडक्यात:

  1. मातृ सुरक्षा दिनाचा उद्देश गर्भवती आणि होणाऱ्या मातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे आहे.

  2. 10 जुलै ही तारीख जागतिक लोकसंख्या दिनाशी संबंधित असल्यामुळे निवडण्यात आली.

  3. गरोदरपणात आणि नंतरही योग्य काळजी घेतली नाही, तर आई आणि बाळाच्या आरोग्याला धोका होतो.

Importance of maternal health awareness in India: मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असतो. या काळात तिच्या शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. योग्य काळजी घेतली नाही, तर या काळात आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणूनच ‘मातृ सुरक्षा दिना’चे महत्त्व अधिकच वाढते.

का साजरा केला जातो 'मातृ सुरक्षा दिन'?

आज 10 जुलै रोजी मातृ सुरक्षा दिन देशभरात साजरा केला जात आहे. 2005 पासून हा दिवस साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली असून, यामागचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे गर्भवती आणि होणाऱ्या मातांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे.

10 जुलै रोजीच का साजरा करतात?

10 जुलै ही तारीख निवडण्यामागेही एक विशेष कारण आहे. याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. मातृ सुरक्षा आणि लोकसंख्या यांचा घनिष्ठ संबंध आहे. दोन गर्भधारणांमधील योग्य अंतर राखल्यास केवळ आईचं नव्हे, तर बाळाचंही आरोग्य चांगलं राहू शकतं. याच संदेशासाठी 10 जुलै निवडण्यात आला आहे.

गरोदरपणात विशेष काळजी का आवश्यक?

गर्भवती महिलेला यामध्ये संतुलित आहार, वेळचं तपासणं, मानसिक शांती आणि वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक असतं. अनेक वेळा रक्तदाब, रक्तस्त्राव, हृदयविकार अशा आरोग्य समस्यांमुळे प्रसूतीदरम्यान धोका वाढतो. त्यामुळे गरोदरपणात आणि त्यानंतरही मातेला विश्रांती आणि उपचार दोन्ही मिळणं महत्त्वाचं आहे.

आरोग्य आणि अंतर — दोन्ही महत्त्वाचे

मातृ सुरक्षा दिनाच्या माध्यमातून आणखी एक मुद्दा अधोरेखित केला जातो तो म्हणजे दोन अपत्यांमध्ये योग्य अंतर राखण्याचा. आजही सर्वत्र जागरुकता पसरत असली तरी ग्रामीण भागात अजूनही कमी अंतराने पुन्हा गर्भधारणा केली जाते. फार कमी कालावधीत पुन्हा गर्भधारणा झाल्यास आईचं शरीर पूर्णपणे सावरत नाही, आणि बाळाचं आरोग्यही प्रभावित होऊ शकतं. त्यामुळे डॉक्टरांशी सल्ला घेऊन योग्य वेळ निवडणं गरजेचं असतं.

अजूनही जागरूकतेची गरज

अनेक महिलांना आजही खासकरून ग्रामीण भागात गरोदरपणात किंवा प्रसूतीनंतर योग्य ती वैद्यकीय मदत मिळत नाही. असंख्य महिलांचा मृत्यू गर्भधारणेदरम्यान किंवा प्रसूतीनंतर होण्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी समाजाच्या प्रत्येक स्तरावरून प्रयत्न होणे आवश्यक आहे.

FAQs

  1. मातृ सुरक्षा दिन का साजरा केला जातो? (Why is Matru Suraksha Din celebrated?)
    मातांच्या सुरक्षित गर्भधारणेसाठी आणि प्रसूतीपूर्व व प्रसूतिनंतर योग्य काळजी घेण्यासाठी जनजागृती करण्यासाठी.

  2. 10 जुलै हीच तारीख का निवडण्यात आली आहे? (Why is July 10 selected for this day?)
    कारण 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा होतो आणि दोघांमध्ये आरोग्यविषयक दुवा आहे.

  3. गरोदरपणात कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? (What care is needed during pregnancy?)
    संतुलित आहार, नियमित तपासणी, मानसिक स्थैर्य आणि वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असते.

  4. दोन गर्भधारणांमधील अंतर ठेवणे का महत्त्वाचे आहे? (Why is spacing between two pregnancies important?)
    आईचं शरीर पूर्णपणे सावरण्यासाठी आणि बाळाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी योग्य अंतर आवश्यक असतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com