स्त्रियांचं आयुष्य रजोनिवृत्तीनंतर (Menopause) एक मोठा टप्पा गाठतं. वयाच्या ४५-५५ दरम्यान येणाऱ्या या नैसर्गिक प्रक्रियेमुळे शारीरिक, मानसिक व भावनिक पातळीवर बदल दिसून येतात. गरज आहे ती समज, संयम आणि समायोजनाची..सर्वसाधारण त्रास : हॉट फ्लॅशेस, रात्रभर घाम, चिडचिड, नैराश्य, झोपेचा अभाव, हाडांची झीज, सांधेदुखी, त्वचा-केस गळती, वाढतं वजन व चरबी पोटाभोवती.हे नैसर्गिक बदल असले तरी, योग्य योगाभ्यास, आहार आणि जीवनशैलीने त्यावर नियंत्रण ठेवता येते..भुजंगासन : मणक्याला बळकट करतं, थायरॉईड आणि स्त्री-संप्रेरकांना संतुलित करतं.सेतुबंधासन : पेल्व्हिक भागातील रक्तप्रवाह सुधारतो, गर्भाशय व अंडाशयांचं स्वास्थ्य टिकवतो.शशकासन : तणावमुक्ती, मानसिक स्थैर्य, हार्मोन बॅलन्स.सुप्त बद्धकोनासन : प्रजनन अवयवांच्या क्षेत्रात आराम, PMS आणि Menopause दोन्हीच्या लक्षणांवर फायदेशीर.वज्रासन : पचन सुधारण्यासाठी दररोज १० मिनिटं.टीप - आसने सकाळी किंवा संध्याकाळी करा. कोणतीही वेदना झाल्यास आसन लगेच थांबवा..मनःशांती व संप्रेरक समतोलासाठीअनुलोम-विलोम : नाडीचे शुद्धीकरण, मनःशांती, झोप सुधारते.भ्रामरी प्राणायाम : भावनिक अस्थिरता, नैराश्य, चिडचिड यावर विशेष प्रभावी.शीतली प्राणायाम : शरीरात शांतता निर्माण करते, Hot Flashes कमी करते.उज्जायी प्राणायाम : थायरॉईड संतुलन, झोप उत्तम होण्यासाठी उपयुक्त.रोज सकाळी किंवा झोपण्यापूर्वी १०-१५ मिनिटांचा प्राणायाम अवश्य करा..योग्य आहारकाय खावं?हिरव्या भाज्या (पालक, मेथी, शेपू)दूध, ताक, चीज, लोणी – पण प्रमाणातगहू-जव-नाचणी यांचा समावेशसालासकट फळं - सफरचंद, पेरू, केळी, डाळिंबसात्त्विक अन्न : मूगडाळ खिचडी, सूप, भिजवलेले बदाम/खजूर .काय टाळावं?प्रोसेस्ड फूड्स, जास्त साखरकॅफिनयुक्त पेये, जास्त चहा/कॉफीजास्त मीठ, लोणचं .मानसिक स्वास्थ्याची काळजी -स्वतःला दोष देणं बंद करा : रजोनिवृत्ती ही आजार नाहीस्त्री-समूहात सामील व्हा : संवाद आणि सामर्थ्य मिळतंआवडती सर्जनशीलता जोपासा : संगीत, चित्रकला, लेखनझोपेसाठी : झोपण्याआधी श्वसन साधना, हळदीचं दूधरजोनिवृत्ती म्हणजे संपलेलं आयुष्य नाही, तर अंतर्मुख होण्याचा, आत्मसन्मानाने नव्याने उमलण्याचा टप्पा आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.