Testosterone Symptoms: पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरोनची पातळी कमी झाल्यास दिसतात 'हे' 5 लक्षण, वेळीच साधा डॉक्टरांशी संपर्क

Testosterone Symptoms: पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी झाल्यास कोणते लक्षण दिसतात. याबाबत सविस्तरपणे जाणून घेऊया.
Testosterone Symptoms
Testosterone SymptomsSakal
Updated on

Testosterone Symptoms: आजकालच्या धावपळीच्या जीवनात व्यायामाचा अभाव आणि अयोग्य खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अनेक पुरूषांना टेस्टोस्टेरॉनसारख्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यास अंडकोषांमध्ये पुरेशा प्रमाणात टेस्टोरॉनची पातळी कमी होते.

या समस्येला अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात. अंडकोष, पिट्यूटरी ग्रंथी किंवा हायपोथालेमवर परिणाम करणाऱ्या परिस्थिती किंवा जखमांसह या समस्येची अनेक संभाव्य कारणे आहेत. या समस्येवर उपचार करण्यासाठी अनेक डॉक्टर टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपीचा वापर करतात. पुरूषांच्या शरीरातील टेस्टोरॉनची पातळी कमी झाल्यावर अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. त्यावर उपाय कोणते आहेत हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाल्यास पुढील लक्षणे दिसतात

शारिरिक संबंध

शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी झाल्यास पुरुषांची सेक्स ड्राइव्ह कमी होऊ शकते. यामुळे शारिरिक संबंध ठेवण्याची पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे जोडप्यांमध्ये समस्या निर्माण होऊ लागतात. तसेच वंध्यत्वाची समस्या देखील वाढू शकते.

स्मरणशक्ती कमी होणे

पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरोनची पातळी कमी झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो. यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ शकते. असे लक्षण तुमच्यात दिसत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Testosterone Symptoms
Diwali 2024 Fashion Tips: तुम्हालाही सणासुदीत परफेक्ट लूक हवायं? मग तुमच्या वॉर्डरोबमध्ये 'या' 4 प्रकारच्या साड्या असल्याच पाहिजेत

गुप्तअंगातील केस गळणे

पुरुषांच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी झाल्यास काखेत आणि गुप्तअंगातील केस गळायला लागतात. हे सुरुवातीच्या लक्षणांमध्ये आढळून येते. जर अशी लक्षणे तुमच्या शरीरात दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अंडकोष संकुचित होणे

अंडकोष संकुचित होणे हे देखील शरीरातील टेस्टोस्टेरॉन हार्मोन कमी झाल्याचे एक लक्षण आहे. यावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही एक अतिशय गंभीर परिस्थिती असू शकते.

शरीरातील चरबी वाढणे

जेव्हा टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी होते तेव्हा शरीरातील चरबी देखील वाढू लागते. विनाकारण तुमच्या शरीरात चरबी वाढत असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. हे गंभीर स्थितीचे लक्षण असू शकते.

काही इतर लक्षणे

गायनेकोमास्टियाचा त्रास

स्नायूंची ताकद आणि घनता कमी होणे

सहनशक्ती कमी होणे

वंध्यत्वाचा त्रास

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com