World Men's Day : पुरुषांना असतो "या" कामात इंटरेस्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Men's Day : पुरुषांना असतो "या" कामात इंटरेस्ट
World Men's Day : पुरुषांना असतो "या" कामात इंटरेस्ट

World Men's Day : पुरुषांना असतो "या" कामात इंटरेस्ट

स्त्री- पुरूषांची कामाची वाटणी ठरलेली असते. सहसा बायकांची काम पुरूष करताना दिसत नसत. पण आता काळ बदलला आहे. बदलत्या काळानुसार आता महिलांची काम पुरूषही आनंदाने करून लागले आहेत. मुलांनाही मुलींप्रमाणे फॅशन करणे आवडू लागले आहे. आंतरराष्ट्रीय पुरूष दिनानिमित्त पुरुषांच्या आवडी कशा बदलल्या आहेत त्यावर एक दृष्टीक्षेप.

यावर्षी ही आहे थीम

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा साधारणपणे एक लिंग संबंध सुधारण्यावर आणि स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करतो.यावर्षी IMD 2021 ची थीम स्त्री आणि पुरुषांमधील चांगले संबंध आहे.

पैसे कमविण्यात भेदभाव नाही

सुरूवातीला घराची जबाबदारी महिलाच सांभाळायच्याय. आता ही जबाबदारी समर्थपणे पुरूषही सांभाळू लागले आहेत. दोघेही नोकरी करत, मुलांची, स्वयंपाकाची पर्यायाने घराची जबाबदारीही वाटून घेत आहेत.

भावनांना महत्व

काही वेळा कुठल्या ना कुठल्या प्रसंगामुळे, तणावामुळे महिलांना रडू येतं. त्या त्यांच्या भावना चांगल्याप्रकारे व्यक्त करू शकतात. पण पुरूषांनी रडलं कि त्यांना काय रडतोस म्हणून हिणवले जात असे. पण आता मात्र हट्टाने पुरूष अशा भावना मोकळेपणाने व्यक्त करू लागले आहेत. समानतेचा काळ असल्याने पुरूष बायकोसमोर का होईना रडून मोकळा होतो. तर महिला पुरुषांपेक्षा जास्त हिमतीने एखाद्या कठीण प्रसंगाचा सामना करतात, असेही पाहायला मिळते.

Food

Food

आवडीला महत्व

घर कसं सजवायचं याचा निर्णय घेण्यात महिला आघाडीवर असायच्या. पण आता याबाबत पुरूषही आग्रही असल्याचे पहायला मिळते. तसेच बायकोबरोबर शॉपिंग करणे, तिच्यासह योगा, व्यायाम करणे या गोष्टी त्याला आवडतात. तसेच लॉंग ड्राईव्हला जाताना बायकोने ड्राईव्ह करावं असा आग्रहही आता ते करू लागले आहेत.

loading image
go to top