Men's Winter Styling : पुरुषांनो, या खास स्टायलिंग ट्रिक्स ट्राय करा अन् हिवाळ्यातही दिसा आकर्षक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Men's Winter Styling

Men's Winter Styling : पुरुषांनो, या खास स्टायलिंग ट्रिक्स ट्राय करा अन् हिवाळ्यातही दिसा आकर्षक

Men's winter styling : नवीन वर्ष सुरू झालं आहे आणि थंडीच्या लाटेने देखील कहर गाठला आहे. हिवाळा हा ऋतू आपल्यापैकी बहुतेकांना आवडत असला तरी या ऋतूतील सर्वात मोठी समस्या म्हणजे स्वतःला आकर्षक पद्धतीने स्टाईल करणे. विशेषतः जेव्हा पुरुषांचा विचार केला तर त्यांच्याकडे हिवाळ्यातील पोशाखांमध्ये फारसे पर्याय नसतात आणि संपूर्ण हिवाळ्यात जाड आणि जड कपडे घालणे कठीण असते. म्हणूनच फॅशन एक्स्पर्टची एक खास ट्रिक तुम्ही अवलंबू शकता ती ट्रिक म्हणजे "मोअर लेयर्स मोअर स्टायलिश".

पुरुषांसाठी हिवाळ्यातील खास स्टाइलिंग टिप्स कपड्यांचे लेयरिंग

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी कपड्यांचा लेयर करणे खूप महत्वाचे आहे. विंटर लेअरिंग हा पुरुषांसाठी सर्वात मोठा फायदेशीर ठरतो जो हिवाळ्यात थंडीपासून बचाव करतो तसेच स्टायलिश लुक देखील देतो.

हेही वाचा: Winter Recipe: वजन कमी करणारा आरोग्यवर्धक चिंचेच्या पानांचा चहा कसा बनवायचा?

Men's Winter Styling

Men's Winter Styling

हिवाळ्यात फॅशनेबल दिसण्यासाठी 3 लेयरमध्ये कपडे स्टाईल करा.

  • लेयर्समध्ये कपडे स्टाइल करताना, हे लक्षात ठेवा

  • पातळ कपड्यांचे लेयरिंग चांगले दिसते, जाड कपड्यांचे थर लावणे टाळा.

  • कपड्यांचे टेक्सचर आणि रंगाची विशेष काळजी घ्या

  • मुलांसाठी स्टायलिश आणि फॅशनेबल कपडे निवडताना कपड्यांचा रंग आणि पोत याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे,

हेही वाचा: Winter Look : थंडीतही ट्राय करा एकापेक्षा एक भारी लूक्स, पहा लिस्ट

  • विशेषतः हिवाळ्यात काही भडक रंग मुलांवर खूप वाईट दिसू शकतात. म्हणूनच तुम्ही काळा, नेव्ही ब्लू, चारकोल, मोहरी पिवळा आणि ऑलिव्ह ग्रीन असे रंग निवडू शकता.

  • जॉगर्स, स्वेटशर्ट आणि हुडीज जे साधे, ट्रेंडी आणि स्टायलिश दिसतात. तुम्ही हिवाळ्यातील जॉगर्स आणि स्वेटशर्टला रोजच्या पोशाखाप्रमाणे स्टाइल करू शकता.

Men's Winter Styling

Men's Winter Styling

हिवाळ्यातील अ‍ॅक्सेसरीजसह लूक करा पूर्ण

हिवाळ्यात एकंदरीत स्टायलिश आणि आकर्षक दिसण्यासाठी, तुम्ही हिवाळ्यातील स्कार्फ, हातमोजे आणि कॅप्स यांसारख्या काही अ‍ॅक्सेसरीज स्टाइल करू शकता. हाय नेक स्वेटरसह ठळक आणि व्हायब्रंट दागिने देखील खूप स्टाइलिश दिसू शकतात. म्हणूनच लेअरिंगसह काही विंटर अ‍ॅक्सेसरीज वापरायला विसरू नका.