Mental Health: तुमच्या 'या' सवयी मानसिक आरोग्यासाठी ठरू शकतात घातक

Mental Health: मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
Bad Habits For Mental Health
Bad Habits For Mental HealthSakal

mental health these habits very dangerous for mental health

निरोगी शरीरासाठी शारीरिक चांगले आरोग्य जितके महत्त्वाचे असते, तितकेच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे असते. मानसिक आरोग्य खराब झाल्यामुळे अनेक लोक डिप्रेशनचेही शिकार होत आहेत. तुमच्या काही सवयींचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. ज्याचे परिणाम तुमच्या संपूर्ण शरीराला भोगावे लागतात. तुमच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्यांचा तुमच्या मानसिक आरोग्यावर हळूहळू नकारात्मक परिणाम होतो हे पुढील मुद्द्यावरून समजून घेऊया.

  • पुरेशी झोप न घेणे

पुरेशी झोप न घेणे मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते. आजकाल लोक रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर वेळ घालवतात आणि मग उशीरा झोपतात. यामुळे झोप पुर्ण होत नाही. यामुळे डोकेदुखीचा त्रास होतो. यासर्व गोष्टींचा मानसिक आरोग्यावर देखील नकारात्मक परिणाम होतो. यामुळे 7 ते 8 तासाची पुरेशी झोप घ्यावी.

  • पौष्टिक आहाराचा अभाव

तुमच्या शारीरिक आरोग्याव्यतिरिक्त तुम्ही जे काही खाता त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. आजकाल लोक फास्ट फुड आणि जंक फूडचे सेवन करतात. यामुळे वजन झपाट्याने वाढतेच पण मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या आहारात अशा गोष्टींचा समावेश करावा ज्या तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगल्या आहेत. उदा. हिरव्या भाज्या, फळं, सुकामेवा, अंडी यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.

  • जास्त ताण घेणे

आजकाल अनेक लोक ऑफिसमधील काम आणि वैयक्तिक जीवन यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न करताना छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेण्यास सुरुवात करतात. तणावामुळे लोक हळूहळू डिप्रेशनमध्ये जाऊ लागतात, ज्यामुळे मानसिक आरोग्याला खूप नुकसान होऊ शकते.

Bad Habits For Mental Health
Career Success: करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी ध्यान आणि सकारात्मकता आहे महत्वाची
  • व्यायाम न करणे

नियमितपणे व्यायाम न केल्याने मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. व्यायाम किंवा योगा केल्याने शरीर निरोगी राहते तसेच मुड चांगला राहतो. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. त्यामुळे नियमितपणे योगा किंवा व्यायाम करावा.

  • छंद न जोपासने

आजच्या धावपळीच्या जीवनात लोक स्वतःचे छंद जापासणे विसरले आहेत. तुमच्या व्यस्त कामाच्या दरम्यान स्वतःच्या छंदांसाठी थोडा वेळ काढा. यामध्ये तुम्हा वाचन करू शकता, गाणं म्हणू शकता, डान्स करू शकता. असे केल्याने तुमचे मन शांत होईल आणि मानसिक आरोग्य देखील चांगले राहिल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com