Milind Soman running in smog
Milind Soman running in smogsakal

Milind Soman runs barefoot: मिलिंद सोमण नुकतेच धुक्यात अनवाणी पायांनी पळताना दिसले. पण खरंच हे शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात.

Milind Soman Runs In Smog: सतत तंदुरुस्तीविषयक कामांसाठी चर्चेत असलेले मिलिंद सोमण नुकतेच दिल्लीतील गुरुग्राम येथे धुक्यामध्ये अनवाणी पायांनी पळताना दिसले. पण धुक्यामध्ये किंवा प्रदूषणयुक्त हवेत पळल्याने आपल्याला स्वास्थ्य संबंधी समस्या उद्भवू शकतात असे तज्ञ सांगतात.
Published on

Milind Soman Runs barefoot in Smog: हिवाळा सुरु झाला की सगळीकडे थंडी पडायला सुरुवात होते. आणि बऱ्याच ठिकाणी धुकं सुद्धा पडतं. दिल्लीमध्ये सध्या ४०० पेक्षा जास्त हवा गुणवत्ता निर्देशांक दर्शवला जात आहे. ही प्रदूषणाची अत्यंत गंभीर श्रेणी मानली जाते. परंतु एवढ्या प्रदूषणातही बॉलीवूड अभिनेता मिलिंद सोमण याने गुरुग्राम येथे अनवाणी पायांनी पळतानाची पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली.

तज्ज्ञांच्यानुसार प्रदूषणात व्यायाम केल्याने बरेच आजार उद्भवू शकतात. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत दिल्लीच्या धर्मशाळा नारायण हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार, डॉ. नवनीत सूद म्हणतात की प्रदूषणात बाहेर जातानाही तोंडाला मास्क लावून जावे. ज्यामुळे नको असलेले आजार आपल्याला विळखा घालत नाहीत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com