Sari Looks : पार्टीत क्लासी दिसायचे आहे? मग, मीरा राजपूतच्या या साडी लूक्सपासून घ्या प्रेरणा

पार्टीसाठी ट्रेंडी आणि एलिगंट लूक करण्यावर महिलांचा नेहमीच भर असतो.
Sari Looks
Sari Looksesakal

Sari Looks : डिसेंबर महिना सुरू झाला की, आपल्या सर्वांना वेध लागतात ते ख्रिसमसचे. अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस येऊन ठेपला आहे. त्यामुळे, बाजारात सर्वत्र ख्रिसमससाठी लागणाऱ्या वस्तू आणि सजावटीच्या गोष्टींनी बाजारपेठा सजल्या आहेत.

ख्रिसमसनिमित्त विविध पार्ट्यांचे आयोजन केले जाते. या छोट्या-मोठ्या पार्ट्यांना  जाण्यासाठी मग कोणता लूक करावा? असा प्रश्न महिलांना पडतो. पार्टीसाठी काहीतरी ट्रेंडी आणि ग्लॅमरस पार्टीवेअर लूक करण्यावर महिलांचा नेहमीच भर असतो. आज आपण बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूतकडून काही फॅशन लूक्सची प्रेरणा घेणार आहोत.

मीरा राजपूतचा फॅशन सेन्स कमालीचा आहे. तिच्या फॅशन सेन्सपुढे बॉलिवूड अभिनेत्री देखील फिक्या पडतात. आज आपण मीरा राजपूतच्या पार्टीवेअर साडी लूक्सवर एक नजर टाकणार आहोत.

Sari Looks
Lehenga Tips : संगीत फंक्शनसाठी लेहेंगा खरेदी करण्यापूर्वी फॉलो करा ‘या’ खास टीप्स

रॉयल लूक

मीरा राजपूत साड्यांमध्ये अप्रतिम दिसते. साडीमध्ये तिने कॅरी केलेली स्टाईल नेहमीच लक्ष वेधते. आता या निळ्या रंगाच्या साडीमध्ये मीराचा रॉयल आणि क्लासी लूक पहायला मिळतोयं. ऑर्गेंन्झा सिल्क बेस्ड असलेल्या या निळ्या रंगाच्या साडीमध्ये मीरा रॉयल आणि क्लासी दिसत आहे.

मीराच्या या साडीवर आणि ब्लाऊजवर जरदोसी आणि सोनेरी वर्क पहायला मिळत आहे. या क्लासी लूकवर साजेशी हेअरस्टाईल मीराने केली आहे. गळ्यात तिने कुंदन वर्क असलेला सुंदर चोकर घातला असून, मिनिमल मेकअप केला आहे. तिचा हा लूक पार्टीसाठी परफेक्ट आहे.

रेड साडी लूक

या लाल रंगाच्या साडीत मीराचा एलिगंट लूक पहायला मिळतोयं. या प्लेन लाल रंगाच्या साडीवर मिरर वर्क करण्यात आले आहे. या साडीवर मॅचिंग मिरर वर्कचा ब्लाऊज तिने परिधान केला असून यामुळे तिच्या लूकला चारचॉंद लागले आहेत.

या साडीवर साजेसा मेकअप, हेव्ही कानातले आणि मोकळ्या केसांची सुंदर हेअरस्टाईल मीराने कॅरी केली आहे. त्यामुळे, तिचा लूक छान जमून आला आहे.

ख्रिसमसमध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे, ही लाल रंगाची साडी तुम्ही देखील मीराप्रमाणे स्टाईल करू शकता आणि तुमच्या लूकला क्लासी बनवू शकता.

Sari Looks
Winter Fashion Tips : हिवाळ्यात दिसायचे आहे कूल? मग, ‘या’ सोप्या टीप्सच्या मदतीने मिळवा स्टायलिश लूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com