Miss Universe 2022 : नेमका मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्हर्स मध्ये काय आहे फरक?

जगतसुंदरी आणि विश्वसुंदरी या नावांशिवाय या स्पर्धा आणि किताबामध्ये काय फरक आहे, जाणून घ्या.
Miss Universe 2022
Miss Universe 2022esakal

What is Difference Between Miss World And Miss Universe : सध्या सगळीकडे २०२२च्या विश्वसुंदरी स्पर्धेचे वेध लागलेले आहे. १४ जानेवारीला जागात तर भारतात १५ जानेवारीच्या पहाटे हा सोहळा बघायला मिळणार आहे. यंदा भारताचं प्रतिनिधीत्व दिवीता राय करणार आहे. पण मुळात जगतसुंदरी आणि विश्वसुंदरी या नावांशिवाय या स्पर्धा आणि किताबामध्ये काय फरक आहे, याविषयी सगळ्यांमध्ये संभ्रम असतो. जाणून घेऊया.

त्यात स्पर्धकाचा चेहरा, देहबोली, विनोदबुद्धी, हजरजबाबीपणा, हुशारी आणि चाणाक्षपणा लक्षात घेऊन ज्युरी सुंदरीची निवड करतात. या दोन्ही स्पर्धा दोन वेगळ्या संस्थांतर्फे घेतल्या जातात.

Miss Universe 2022
Miss Universe 2022: हा किताब मिळवून सुश्मिता सेननं उंचावली होती भारतीयांची मान!

स्पर्धांचे आयोजन

  • मिस युनिव्हर्स स्पर्धेची सुरवात कपडे कंपनी पॅसिफिक मिल्सने १९५२ मध्ये कॅलिफोर्निया येथे केली.

  • मिस वर्ल्ड १९५१ मध्ये युके मध्ये प्रथम भरविली गेली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धा आहेत.

Miss Universe 2022
Miss Universe 2022 : मिस युनिवर्सला वर्षभरासाठी फ्री मिळतात जगातल्या 'या' 5 महागड्या सुविधा

स्पर्धांचे अध्यक्ष

  • मिस वर्ल्ड संस्थेच्या अध्यक्ष ज्युलिया मोर्ले या असून त्यांच्या पतीने या स्पर्धेची सुरवात केली होती.

  • मिस युनिव्हर्स स्पर्धा संस्थेच्या अध्यक्ष पॉला शोगर्ट असून त्यांच्या पूर्वी या संस्थेचे अध्यक्षपद अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भूषविले होते.

Miss Universe 2022
Miss Universe 2022: भारतात सौंदर्य खूप आहे पण विश्वसुंदरी फक्त तीनच..

कोण कोणत्या स्पर्धेसाठी?

या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विजयी असणं आवश्यक आहे. त्यातही अंतिम विजेती मिस युनिव्हर्स स्पर्धेसाठी जाते. तर पहिली उपविजेती (1st runerup) ही मिस वर्ल्डसाठी जाते.

सर्वाधिक कोणत्या देशांच्या विजेत्या

  • मिस वर्ल्डचा किताब सर्वाधिक वेळा व्हेनेझुएलाच्या स्पर्धकांनी जिंकला आहे.

  • मिस युनिव्हर्सचा किताब सर्वाधिक वेळा युएसएने जिंकला आहे.

भारताच्या आजपर्यंतच्या विजेत्या

  • मिस वर्ल्ड स्पर्धेत भारतातर्फे रिता फरिया (१९६६), ऐश्वर्या राय (१९९४), डायना हेडन (१९९७), युक्ता मुखी (१९९९), प्रियांका चोप्रा (२०००), मानुषी छील्लर (२०१७) यांनी यश मिळविले

  • मिस युनिव्हर्स मध्ये सुश्मिता सेन (१९९४), लारा दत्ता (२०००) आणि हरनाज संधू २०२१ यांनी यश मिळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com