लाइफस्टाइल
Skin Care: सोलापूर मधील त्वचारोग तज्ज्ञांची सौंदर्यवृद्धीसाठी नवी संकल्पना
Solapur Mission Beauty: पंचसूत्री माध्यमातून शारीरिक, मानसिक आणि आत्मिक सौंदर्याचा समन्वय साधणारी महिलांसाठी 'मिशन ब्यूटी' मोहीम
Solapur Mission Beauty: सोलापुरातील महिला त्वचारोग तज्ज्ञांनी एकत्र येऊन सौंदर्य वाढीसाठी नवी संकल्पना समाजासमोर मांडली आहे. सौंदर्याची परिभाषा केवळ त्वचेपुरतीच मर्यादित नसून, आरोग्य, निरोगी मन, चांगले विचार, व्यक्तिमत्त्व व त्वचेचे आरोग्य या पंचसूत्रीद्वारे एक लाख महिलांपर्यंत हा संदेश पोचविण्याचा संकल्प करत या त्वचारोग तज्ज्ञांनी ‘मिशन ब्यूटी’ मोहिमेद्वारे सौंदर्याची नवी परिभाषा समाजासमोर मांडली आहे.

