Mehndi
Mehndi sakal

Mehndi For Hair: मेहंदीत या गोष्टी मिक्स करुन लावा, केस होतील काळेभोर

केसांना नैसर्गिकरित्या कलर करण्यासाठी तसंच केसांची चमक वाढवण्यासाठी मेहंदी हा एक उत्तम पर्याय आहे.
Published on

Henna For Hair: मेहंदीचा वापर केसांसाठी अनेक वर्षांपासून केला जात आहे. मेहंदी लावल्याने केस चांगले राहतात. म्हणूनच बहुतेक स्त्रिया केसांना कलर करण्याऐवजी मेहंदी वापरतात, परंतु बर्‍याचदा  महिलांची तक्रार असते की मेहंदी लावल्यानंतर त्यांच्या केसांना चांगला कलर येत नाही.

मेहंदीमध्ये काय मिसळावे?

केसांच्या कलरसाठी बीटरूट कसे वापरावे

केसांना कलर करण्यासाठी मेहंदी फायदेशीर आहे. याच्या वापराने केसांना कलर तर येतोच पण ते निरोगीही राहतात. जर तुम्हाला मेहंदीचा कलर गडद हवा असेल तर तुम्ही यासाठी बीटरूट वापरू शकता. बीटरूटचा कलर लाल असतो-

  • सर्व प्रथम बीटरूट नीट धुवून घ्या.

  • नंतर किसून घ्या.

  • गॅसवर एका मोठ्या भांड्यात पाणी ठेवा. आता त्यात किसलेले बीटरूट घाला.

  • पाणी अर्धे होईपर्यंत उकळवा.

  • ते थंड झाल्यावर हे पाणी मेहंदीच्या पेस्टमध्ये मिसळा.

  • आता जेव्हा तुम्ही केसांमध्ये मेहंदी लावाल तेव्हा केसांचा रंग हलका बरगंडीसारखा दिसेल. हा कलर लवकर जाणार नाही कारण हा नैसर्गिक कलर आहे.

Mehndi
Medicinal Plants At Home: या खास औषधी वनस्पती आपल्या घरी आवर्जून लावा, अनेक आजारांपासून राहाल दूर

केसांना जास्वंदाचे फुल लावण्याचे फायदे

जास्वंदाचे फुल केसांसाठी फायदेशीर आहे. केस पांढरे होण्यापासून ते केस गळण्यापर्यंतची समस्या दूर करण्यात हे फूल मदत करते. मेहंदी लावल्यानंतर जर तुमच्या केसांना कलर नीट बसत नसेल तर तुम्ही यासाठी जास्वंदाच्या फुलाची पावडर वापरू शकता. ही पावडर तुम्हाला बाजारात सहज मिळेल.

  • मेहंदीच्या पेस्टमध्ये 2 चमचे जास्वंदाच्या फुलाची पावडर टाका.

  • ते चांगले मिसळा आणि केसांना लावा.

  • ते तुमच्या केसांना लाल कलर देईल.

केसांना मेहंदी लावण्यासाठी काय-काय टाकावे?

केसांना मेहंदी लावल्यानंतर कलर नीट येत नाही, अशी महिलांची अनेकदा तक्रार असते. मेहंदीचा रंग चांगला येण्यासाठी लवंग चहाच्या पाण्यामध्ये उकळा. मेंदीमध्ये लवंग पाणी, 2 चमचे काताची पावडर लावल्याने केसांना चांगला कलर येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com