जास्त RAM मुळे फोन होईल फास्ट, किती जीबीचा मोबाईल घेणं फायदेशीर?

जास्तीत जास्त रॅम दिल्याने तुमचा मोबाईल अगदी फास्ट चालेल असा दावा करत मोबाईल कंपन्या मार्केटिंग करतात. मात्र जास्त रॅम असल्याने मोबाईल खरचं फास्ट चालतो का? की केवळ जास्त खप व्हावा म्हणून मोबाईल कंपन्यांची ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे
how much ram is enough for a phone
how much ram is enough for a phoneEsakal
Updated on

मार्केटमध्ये मोबाईल कंपन्यांमध्ये कायमच मोठी स्पर्धा पाहायला मिळते. कधी कॅमेऱ्याला जास्तीत जास्त मेगापिक्सल Megapixel देण्याचा दावा केला जातो. तर कधी सगळ्यात जास्त काळ टिकणारी बॅटरी. Mobile Tips in Marathi how much ram required for smart phone performance

तसंच सध्या मार्केटमध्ये स्पर्धा पाहायला मिळतेय ती म्हणजेच RAMची. जास्तीत जास्त GB रॅम मोबाईलमध्ये असलेल्याचा दावा अनेक कंपन्या करू लागल्या आहेत. एकेकाळी केवळ २ मग त्यानंतर ४ GB रॅम देणाऱ्या मोबाईल कंपन्या आता फोनमध्ये अगदी १८-२० GB RAM देऊ लागल्या आहेत.

जास्तीत जास्त रॅम दिल्याने तुमचा मोबाईल अगदी फास्ट चालेल असा दावा करत मोबाईल कंपन्या मार्केटिंग करतात. मात्र जास्त रॅम असल्याने मोबाईल खरचं फास्ट चालतो का? की केवळ जास्त खप व्हावा म्हणून मोबाईल कंपन्यांची ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे आणि त्याला ग्राहक बळी पडत आहेत हे जाणून घेऊयात.

जास्त RAM मुळे मोबाईल फास्ट होतो का?

कोणत्याही स्मार्टफोनच्या Smartphone परफॉर्मन्ससाठी त्यातील अनेक गोष्टी महत्वाच्या असतात. अर्थात फोनमध्ये जास्त जीबी रॅम असणं ही देखील त्यातील एक महत्वाची गोष्ट आहे. जास्त रॅम असल्याने फोनमधील अॅप्स आणि इतर प्रोसेसिंग क्रिया होण्यासाठी जास्त स्पेस उपलब्ध होते.

हे देखिल वाचा-

how much ram is enough for a phone
Mobile Phone Use In Morning : सकाळी उठल्या उठल्या मोबाईल वापरता? ही सवय बदला, जाणून घ्या परिणाम

किती GB रॅम असलेला मोबाईल घेणं योग्य?

मोबाईलची रॅम किती जीबी हवी हे प्रत्येकाच्या मोबाईलच्या वापरावर अवलंबून आहे जर तुम्हाला कायम अनेक अॅप्सचा वापर करावा लागत असेल तर तुम्हाला जास्त रॅमची गरज भासेल. तज्ञांच्या मते जर तुमचा वापर साधारण असेल ८-१२ GB RAM ही पुरेशी असते.

अनेकांना मोबाईलमध्ये विनाकारण अनेक अॅप्स इन्स्टॉल करून ठेवण्याची सवय असते. हे अॅप दिवसेंदिवस वापरलेही जात नाहीत. मात्र ते अधिक स्पेस घेत असतात. यासाठीच गरजेचं अॅप ठेवल्यास कमी रॅममध्ये ही तुमचा मोबाईल फास्ट चालू शकतो.

मोबाईलचा प्रोसेसर

मोबाईल फास्ट होण्यासाठी ज्या इतर गोष्टी जबाबदार असतात त्यापैकी सर्वात महत्वाची भूमिका असते ती म्हणजे मोबाईलच्या प्रोसेसरची. प्रोसेसर चांगला असेल तर तुमचा मोबाईल नक्कीच चांगला परफॉर्मन्स देईल.

सॉफ्टवेअर अपडेट

फोन फास्ट चालण्यासाठी फोनमध्ये अपडेटेड सॉफ्टवेअर असणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये सध्या अँन्ड्राॅइड १३ आणि iOS 16 हे सगळ्यात लेटेस्ट सॉफ्टवेअर आहेत.

यासाठीच एखादा फोन खरेदी करत असताना तो फास्ट चालावा यासाठी त्यातील केवळ RAM न पाहता इतर फिचर्स आणि सॉफ्टवेअर पाहणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com