

Using cashless payments wisely and supporting meaningful causes can help build financial discipline and long-term security.
सरोज काशीकर
समाजात चोर लोकांचं जास्त लक्ष पर्स, पाकीट हे हस्तगत करणं हेच असतं. त्या दृष्टीने ऑनलाइन कॅशलेस आर्थिक व्यवहार करण्याची सिस्टीम आल्यावर मला खूपच आनंद झाला आणि मी ते सगळं अगदी उत्सुकतेने लगेच शिकून घेतलं. अर्थात मी ज्या अकाउंटवरून ऑनलाइन पेमेंट करते, त्या अकाउंटवर खूप पैसे न ठेवता साधारण महिनाभर लागतील एवढेच पैसे ठेवते.