
Makar Sankranti: परवाच्या भोगी आणि कालच्या संक्रान्त सणांनिमित्ताने एकच गोष्ट करण्याच्या तीन अगदी वेगळ्या तऱ्हा नजरेस आल्या. आपल्या भारतीय संस्कृतीतील संक्रांत हा पोंगल, पोळा, ओणम, भाऊबीज, नारळी किंवा राखी पौर्णिमा या सणांसारखा निधर्मी सण असावा.
एक तर पाश्चात्य मूळ असलेल्या ग्रेगरीयन कॅलेंडरनुसार हा सण १४ जानेवारीला आणि लिप वर्षात १५ जानेवारीला साजरा होतो. दुसरे म्हणजे या सणाचे मूळ पुर्णतः भौगोलिक स्वरुपाचे आहे. उत्तरायण आणि दक्षिणायन. त्यानिमित्त आज मी माझ्या एक मित्राला चक्क इच्छामरणाचे वरदान लाभलेल्या शरपंजरी भीष्माचार्यांची कथा ऐकवली.