
डायनिंग टेबल हे केवळ जेवणाचे ठिकाण नसून, ते कुटुंब आणि मित्रांच्या एकत्र येण्याचे एक केंद्र असते. मुलांवर संस्कारांपासून सदस्यांच्या अडचणींबाबत चर्चा करण्याचीही ती जागा असते. योग्य सजावट करून ही जागा अधिक आकर्षक, आरामदायी आणि विशेष बनवता येते. त्यासाठीच्या काही टिप्स बघूया.
फॅब्रिक निवड : कॉटन, लिनन किंवा सिल्कसारख्या साहित्यांपैकी निवड करा. पॉलिएस्टर टेबलक्लॉथ सहज स्वच्छ होतात.
रंगयोजना : उबदार वातावरणासाठी : तपकिरी, गुलाबी, मरून. फ्रेश लूकसाठी : पांढरा, निळा, पिवळा. फेस्टिव्ह सीझनसाठी : गोल्ड, लाल, हिरवा.
रनरचा योग्य वापर : टेबलच्या लांबीपेक्षा सहा-बारा इंच लांब रनर निवडा. ज्यूट किंवा एम्ब्रॉयडरी असलेले रनर्स ट्रेंडी दिसतात.
नॅपकिन फोल्डिंग
डायनिंग टेबलवर नॅपकिन फोल्डिंग्जच्या वेगवेगळ्या कल्पना वापरून तुम्ही ते छान सजवू शकता. क्लासिक फोल्ड (चौकोनी फोल्ड करून प्लेटवर ठेवणे), फॅनशेप (नॅपकिन रिंगमध्ये घालून स्टायलिश लूक देणे), थीमॅटिक फोल्डिंग (सणानुसार, किंवा एखाद्या व्यक्तीच्या आवडीनुसार हार्ट-शेप किंवा इतर कल्पना) अशा प्रकारांचा तुम्ही वापर करू शकता.