
सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्या, युरिक अॅसिड कमी होण्यास मदत होते.
जिरे पाणी पिणे पचन सुधारते आणि युरिक अॅसिड नियंत्रित ठेवते.
कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.
Uric Acid Control: युरिक अॅसिड हा एक प्रकारचा टाकाऊ पदार्थ आहे. जो शरीरातच तयार होतो. जेव्हा हे टाकाऊ पदार्थ शरीरात मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागते तेव्हा ते हळूहळू जमा होऊ लागते. ते स्फटिकांचे आकार घेऊ लागते. काचेच्या पावडरप्रमाणे हे स्फटिक शरीराच्या सांध्यामध्ये जमा होऊ लागतात. यामुळे सांध्यांमध्ये तीव्र वेदना आणि सूज यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तसेच शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढल्याने किडनीशी संबंधित समस्या देखील वाढू शकतात. त्यामुळे युरिक अॅसिड नियंत्रित करण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.