Morning Laziness Remedies : सकाळी-सकाळीच अंगात भरतो आळस तर या टिप्स वापरा, दिवसभर रहाल फ्रेश अन् कूल

गरम पाणी शरीरातील थकवा दूर करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे
Morning Laziness Remedies
Morning Laziness Remediesesakal

Morning Laziness Remedies :

काहीवेळा सकाळी उठल्यानंतर लगेचच आळस अंगात भरतो. कधी तर असं होतं की उठावसंच वाटत नाही अन् झोपही लागत नाही. फक्त शांत पडून रहावं असं वाटतं. जर तुम्हालाही असंच काहीसं होत असेल तर काळजी करण्याची गरज आहे.

वेळेअभावी व्यायामाकडे लक्ष देता येत नाही. जंक आणि फास्ट फूड खाण्याकडे अधिक कल आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत आहे. अशा स्थितीत रात्री झोपल्यानंतर आणि सकाळी उठल्यानंतरही एक विचित्र अस्वस्थता आणि आळस आपल्या आत राहतो. त्यावर सकाळी उठताच काही उपाय केल्याने तुम्हाला चांगला आराम मिळेल.

Morning Laziness Remedies
Morning Coffee : तुम्हीही सकाळी उठून कॉफी पिता काय? लगेच बंद करा ही सवय, वाचा एक्सपर्टचा महत्वाचा सल्ला

अनेकांना अशक्तपणा आणि थकवाही जाणवतो. आज आम्ही तुमच्यासाठी अशाच काही टिप्स घेऊन आलो आहोत, ज्याचा अवलंब केल्यानंतर  तुम्हाला थोडा आराम वाटेल.

मेडिटेशन करा

सकाळी उठल्यानंतर, तुमचे मन शांत करण्यासाठी ध्यान करणे महत्वाचे आहे. सकाळी उठल्यानंतरही थकवा आणि सुस्त वाटण्याचे एक कारण म्हणजे रात्री योग्य झोप न लागणे आणि मानसिक ताण असू शकतो. हे टाळण्यासाठी ध्यान हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुमच्या मनाला चालना देण्यासाठी तुम्ही ताज्या हवेत 20 ते 25 मिनिटे ध्यान केले पाहिजे.

Morning Laziness Remedies
Morning Coffee : तुम्हीही सकाळी उठून कॉफी पिता काय? लगेच बंद करा ही सवय, वाचा एक्सपर्टचा महत्वाचा सल्ला

स्ट्रेचिंग एक्सरसाइज

सकाळी उठल्यानंतर अनेक वेळा अशक्तपणा किंवा थकवा आल्याने आपले शरीर ताठरायला लागते. हे टाळण्यासाठी तुम्ही सकाळी उठल्यानंतर काही स्ट्रेचिंग व्यायाम करू शकता. स्ट्रेचिंग व्यायामामुळे तुमच्या शरीराचे स्नायू उघडतात, ज्यामुळे कडकपणा दूर होईल आणि तुम्हाला आराम मिळेल.

तेलाने मसाज करा

थकवा दूर करण्यासाठी कोमट तेलाने मसाज करणे हा उपाय प्राचिन काळापासून प्रचलित आहे. मसाज केल्याने तुमच्या स्नायूंना आराम मिळतो. बॉडी मसाज केल्याने तुमचे शरीरही ऍक्टिव्ह राहते आणि थकवाही शरीरातून निघून जातो. तेलाच्या मसाजमुळे तुम्हाला केवळ शारीरिक आराम मिळत नाही तर तो तुम्हाला मानसिक आराम करण्यासही मदत करतो.

Morning Laziness Remedies
Morning Tips: केसांमधील गुंता कमी होण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय

कोमट पाण्याने आंघोळ करा

गरम पाणी शरीरातील थकवा दूर करण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. शरीरातील हाडे मोकळी होण्यासाठी तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करू शकता. त्याला हीट थेरपी असेही म्हणतात. गरम पाण्याने आंघोळ केल्याने तुमचा आळस आणि थकवा लगेच दूर होतो आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com