Mother's Day 2024 : एकट्याच राहणाऱ्या आईला या गोष्टींत रमायला शिकवा, तिचा वेळ चांगला जाईल!

Mother's Day 2024 : मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी म्हणजे आज जागतिक मदर्स डे साजरा होतो
Mother's Day 2024
Mother's Day 2024esakal

Mother's Day 2024 :  

पुण्यात राहणाऱ्या सुधा जोशी एका शिक्षिका होत्या. त्यांच्या एकुलत्या एका मुलीला त्यांनी उच्चशिक्षण दिलं. मुलगी परदेशात गेली आणि तिचे लग्नही तिकडेच झाले. लग्नापर्यंत त्यांचे पती सुधीर सोबत होते. पण कोरोनामध्ये त्यांचे निधन झाले.

गेली ३-४ वर्ष त्या एकट्याच पुण्यातील चौकटीत राहतात. मुलगी श्रृती त्यांच्या मागे लागलेली असते की आई ये तू ही माझ्याकडे, एकटीच कशी राहतेस. पण सुधाला तिकडे जायचं नाही. आजकाल शिक्षण नोकरीसाठी बाहेर पडणाऱ्या मुला-मुलींनी भविष्याचा विचार नक्की करावा. पण पावसाची वाट पाहणाऱ्या चातक पक्षासारखी आई-वडिलही त्यांची वाट पाहत आहेत हे लक्षात घ्यावे. (Mothers Day 2024)

Mother's Day 2024
Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

आज जगभरात मदर्स डे साजरा होत आहे. मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी म्हणजे आज जागतिक मदर्स डे साजरा होतो. तुम्हीही आईपासून दूर असाल. तर आईचा वेळा जावा, आईला विरंगुळा व्हावा यासाठी काही गोष्टी नक्की करा.

गायन- वादन क्लास

आईने तुम्हाला वेगवेगळ्या क्लासेसना जायला सांगितले असेल. तुम्ही त्या क्लासेसमध्ये शिकून अधिक हुशार बनला असाल. तर आईलाही काहीतरी आवड असेल. तिने कधीतरी गायन-वादनाच्या क्लासबद्दल तुम्हाला सांगितले असेल. तर हीच ती वेळ आहे जेव्हा तूम्ही आईला क्लास जॉईन करायला सांगू शकता. ज्यामुळे तिचा वेळ चांगला जाईल.

हॅप्पी क्लब

आजकाल अनेक सोसायटीचे हॅपी क्लब असतात. जे आरोग्याच्या बाबतीत जागरूक असतात अशा लोकांचा हा ग्रूप असतो. ते सकाळी जमतात. एकत्र व्यायाम करतात आणि गप्पा गोष्टींनी आईच्या दिवसाची सुरूवात चांगली होते. 

टुरीझम ग्रूप

आईला फिरण्याची इच्छा असेल तर तुम्ही तिला टुरिझम ग्रूपमध्ये जाण्यास सांगू शकता. यात काही महिलांचा ग्रूप जमला तर त्या नेहमीच एकत्र फिरतील. तसेच, तिला या टुरिझम ट्रिपमधून चांगल्या मैत्रिणीही मिळतील.

Mother's Day 2024
Mothers Day 2024 : सगळ्यांसाठी सगळं करणाऱ्या आईसाठी एवढं तर करायलाच हवं? असा बनवा Mothers Day स्पेशल!

आईचा वेळ चांगला जावा यासाठी

आईचा वेळ जावा यासाठी तिला शिकवणी घ्यायला सांगा. आई कुकींग चांगले करत असेल, आईला विणकाम, भरतकाम, शोभेच्या वस्तू बनवता येत असतील. तर सोसायटीतील इतर मुलांना त्या वस्तू शिकवायला सांगा. ज्यामुळे त्या मुलांमध्ये तिचा वेळ जाईल.

Mother's Day 2024
Mother's Day 2024 : आईसाठी मदर्स डे गिफ्ट: स्टिरियोटाइप तोडून नवीन क्षितिजांकडे!

आईला प्रोत्साहन द्या

आईने कॉलनी, सोसायटीतील समारंभात सहभागी व्हावं यासाठी तिला तुम्ही प्रोत्साहीत करा. तुम्ही तिच्यासोबत असताना तिला बाहेर घेऊन जाल तेव्हा तिच्या कामाचे इतर महिलांमध्ये कौतुक करा. यामुळे तिच्या इतर मैत्रिणीही बनतील आणि त्याच तिला तुम्ही नसताना सण,कार्यक्रमात बोलवतील. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com