महिला पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. म्हणजे पुरूषांच्या बरोबरीचं काम त्या करत आहेत. अगदी शेत नांगरणीचं असो वा विमान चालवण्याचे प्रत्येक कामात महिला पोहोचल्या आहेत. त्या स्वत:च्या करिअरसाठी, पायावर उभं राहण्यासाठी मेहनत घेत आहेत. पण तरीही कुठंतरी असं वाटतं की त्या कमी पडत आहेत.
अनेक कंपन्यांमध्ये महिला उच्चभ्रू पदावर पोहचू शकत नाहीत. त्यांना जही पुरूषांच्या हाताखाली काम करावं लागतं. काही मोजक्या महिला आहेत ज्या स्वत:चा व्यवसाय, कंपनीतील उच्च स्थान सांभाळत आहेत. पण प्रत्येकीला हे का शक्य होत नाही. याचा कधी विचार केलाय का?