esakal | तीन पटीने वाढतील केस जर अश्या पध्दतीने वापराल मुलतानी माती हेअर पैक 

बोलून बातमी शोधा


तीन पटीने वाढतील केस जर अश्या पध्दतीने वापराल मुलतानी माती हेअर पैक 
तीन पटीने वाढतील केस जर अश्या पध्दतीने वापराल मुलतानी माती हेअर पैक 
sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोल्हापूर : जर तुमचे केस मर्यादेपेक्षा जास्त गळत असतील आणि यामुळे जर समस्या निर्माण झाली असेल तर तुम्ही घरातच चांगल्या पद्धतीने उपचार करू शकता. यासाठी होम रेमेडी अत्यंत परिणामकारक ठरते.केस गळण्याची समस्या आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. ज्याचे हार्मोनल बॅलन्स बिघडतात खाण्यामध्ये अव्यवस्थितपणा त्याचबरोबर स्काल्प वर फंगल इन्फेक्शन असणे या जेनेटिक समस्या असतील तर ही लक्षणे हेअर फॉलची असतात.

अनेक वेळा आपल्या केसांच्या ठिकाणी केमिकल रिएक्शन झाल्याच्या कारणामुळे केस गळतात. जर आपण खराब झालेल्या शाम्पूचा वापर केला तर त्याचे परिणाम ही तशाच पद्धतीने दिसून येतील अशावेळी केस धुण्यासाठी काही नैसर्गिक घटकांचा वापर करणे आवश्यक आहे. केसांची गळती थांबवण्यासाठी काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करणे आवश्यक ठरते. केस गळत असतील तर त्यावर उपाय म्हणून कांदा हा एक अत्यंत चांगला उपाय मानला जातो. त्याच्यामध्ये असणारे सल्फर मुळे स्काल्प वर जर इन्फेक्शन असेल तर ते दूर होते. त्याचबरोबर केसांची वाढ होण्यासाठी आणि केसाला चमक येण्यासाठी याचा वापर ही केला जातो. आपण या दोन्ही गोष्टींचा वापर करून केस कशा पद्धतीने वाढतील हे या ठिकाणी पाहणार आहोत.अनेक लोकांचा हेअर फॉल इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की त्यांचे स्काल्प दिसू लागते .

केसांची गळती थांबण्यासाठी आपण या ठिकाणी एक असा पॅक तयार करणार आहोत जे कांदा आणि मुलतानी माती यापासून तयार होतो. हा पॅक केस गळती होण्यापासून मोठ्या प्रमाणात संरक्षण देतो. त्याच बरोबर केसांच्या असणाऱ्या अनेक समस्या जसे फंगल इन्फेक्शन अशा गोष्टीही संपुष्टात आणतात.

साहित्य

एक मध्यम आकाराचा कांदा

दोन चमचा मुलतानी माती

एक चमचा कॅस्टर ऑइल

तीन चमचा दही.

कृती

सर्वात पहिल्यांदा कांदा चांगल्या पद्धतीने चिरून घ्या. आणि त्यातील रस काढा. रस काढल्यानंतर कांदा एका कापडामध्ये गुंडाळून पुन्हा एकदा पीळून घ्या त्यामुळे चांगल्या पद्धतीने रस बाहेर येईल. त्यानंतर वरील सर्व घटक चांगल्या पद्धतीने मिक्स करा. मुलतानी माती लवकर मिक्स होत नाही त्यासाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिश्रण हलवणे आवश्यक असते. त्यानंतर या पैकला केसांच्या मुळापासून ते केसाच्या शेवटच्या टोकापर्यंत चांगल्या पद्धतीने लावा. हे पॅक 30 मिनिटापर्यंत केसावरती ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. असे केल्यामुळे केसांना चांगले पोषक तत्व मिळतील. त्याचबरोबर मुलतानी माती मुळे ही फेस पॅक त्या ठिकाणीच टिकून राहील.जर तुम्हाला थंड पाण्याने केस धुतल्यानंतर फक्त सल्फेट फ्री शंपू चा वापर करायचं असेल तर कोणतेही माईल्ड शाम्पू तुम्ही वापरू शकता. ही पद्धत तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरू शकते आणि त्याचा चांगला उपयोग केसांच्या वर दिसू लागतो.

पॅक बाबत ही घ्या काळजी

जर तुमच्या केसांना काही समस्या असतील तर हे पॅक वापरू नका. जर तुम्हाला यातील कोणत्याही घटकाची ऍलर्जी असेल तर किंवा तुम्ही त्वचा  किंवा केसांच्या वर उपचार घेत असाल तर किंवा जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात सायनस ची समस्या असेल आणि त्वचेला गारवा दिल्यामुळे त्रास होत असेल तर या पॅकचा वापर करू नका. जर तुम्हाला कोणतीही डाय सूट होत नसेल तरी सुद्धा या पॅकचा  वापर करू नका